Download App

‘बायजू’च्या बुडणाऱ्या जाहजाला आणखी एक छिद्र; 9 हजार कोटींच्या प्रकरणात ‘ईडी’ वक्रदृष्टी

मुंबई : एज्युटेक कंपनी बायजूला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा धक्का दिला आहे. बायजूचे (BYJU’S) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सह-संस्थापक रवींद्रन बायजू यांना 9 हजार 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवली. ईडीने बायजूवर फेमा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यासाठी अनेक कारणे आधार घेतला असल्याचे सांगितले आहे. यामध्ये देशाबाहेर पाठवलेल्या आगाऊ पैशांच्या संदर्भातील इम्पोर्ट डॉक्यूमेंट्स सादर करण्यात न आल्याच्या आरोपाचाही समावेश आहे. (9,300 crore notice to BYJU’S by Enforcement Directorate for violation of FEMA Act)

मागील दोन ते तीन वर्षांपासून बायजू कंपनीवर विविध प्रकारची संकट घोंगावत आहेत. कंपनीवरील कर्जाचा बोजा आणि वाढता तोटा यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या नोकरीवर गदा आली. गेल्या महिन्यातच कंपनीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. सोबतच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ ट्रान्सफर करत नाही, पगार वेळेवर देत नाही, सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार देऊ केला नाही अशा बातम्या येत आहेत. कंपनीला निधी उभारण्यात अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले होते. अशात आता कंपनीवर ईडीचीही वक्रदृष्टी पडली आहे.

Chhagan Bhujabl : मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही; रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपांवर भुजबळांचं प्रत्युत्तर

ईडीने म्हटले की, बायजूअंतर्गत कार्यरत असलेल्या थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे सह-संस्थापक रवींद्रन यांना परकीय चलन व्यवस्थापनाच्या तरतुदींनुसार 9,362.35 कोटी रुपयांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ‘फेमा’चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटिशीत नमूद केलेल्या रकमेच्या तिप्पट दंड लागू करण्याचा अधिकार ‘ईडी’ला आहे.

एप्रिलमध्ये ईडीने रवींद्रनच्या बेंगळुरू येथील घरासह तीन जागांवर छापा टाकत या मालमत्ता जप्त केल्या होत्या. झडतीनंतर रवींद्रन आणि बायजूचे मुख्य वित्त अधिकारी यांचे जबाब नोंदवण्यात आले. थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडला मिळालेल्या विदेशी गुंतवणुकीबद्दल आणि कंपनीच्या ‘व्यवसाय आचरणा’बाबत आलेल्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सध्या या प्रकरणात रवींद्रन बायजू यांची चौकशी अंतिम टप्प्यात आहे.

Sanjay Raut : ‘दिडदमडीचे लोक आमच्यावर टोळधाड सोडतात, भाजपा म्हणजे’… राऊतांचा हल्लाबोल

‘ईडी’चे आक्षेप काय?

कंपनीने (थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड) 2020-21 या आर्थिक वर्षापासून त्यांची आर्थिक विवरणपत्रे तयार केलेली नाहीत.

2011-2023 दरम्यान कंपनीला थेट परदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) माध्यमातून २८,००० कोटी रुपये मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. या काळात कंपनीने थेट परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली परदेशात सुमारे 9 हजार 754 कोटी रुपये पाठवले.

कंपनीने परदेशी जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावावर सुमारे 944 कोटी रुपये परदेशात पाठवले. कंपनीने ‘फेमा’चे उल्लंघन केल्याने देशाचा मोठा महसूल बुडाल्याचा आरोप आहे.

Tags

follow us