Download App

Crime: धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू

बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या करण्यात आली. ही हत्या नेमकी का करण्यात आली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  • Written By: Last Updated:

Patna BJP Leader Murder : राजधानी पाटणामध्ये भाजप नेत्याला रात्रीच्या काळोखात गोळ्यी झाडून संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डेअरी बूथ ऑपरेटर हा भाजप नेता होता. ही घटना काल रात्री घडली. (BJP Leader Murder) आलमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंगपुरी कालव्याजवळ रात्री दहाच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. 50 वर्षीय अजय साह असं हत्या झालेल्या भाजप नेत्याचं नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हत्या पूर्ववैमन्सातून करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Iran Israel Conflict : इस्त्रायलवरील हल्ला इराणला भोवणार; कठोर निर्बंधांचा अमेरिकी प्लॅन तयार

एफएसएल टीम घटनास्थळी

भाजप नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच पाटणा शहराचे एएसपी घटनास्थळी पोहोचले. या घटनेशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी पोहोचलेले पाटणा शहराचे एएसपी शरथ आरएस यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, एफएसएल टीमला पाचारण करण्यात आलं आहे. कुटुंबीयांचे जबाब घेण्यात येत आहेत. दोन क्रमांकाचे बदमाश बूथवर पोहोचले आणि नंतर बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी गोळीबार केला असंही ते म्हणाले आहेत.

follow us