Agra Girl Video : गाडीवर जाणाऱ्या तुरणीची छेड काढण्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण आग्रा येथील आहे. तेथे एका स्कूटीवरून चाललेल्या मुलीचा पाच जणांनी पाठलाग करत तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. (Video) याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना तत्काळ अटक केली आहे.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर एलन मस्क; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
व्हिडिओ क्लिपमध्ये, दुचाकीस्वार तरुण स्कूटरवरून एका तरुणीचा पाठलाग करताना आणि छळ करताना दिसत आहेत. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणारी एक दुचाकी जप्त केली आहे. एक्स (ट्वीटरवर) शेअर केलेल्या फुटेजमध्ये एका स्कूटरवर जात असलेल्या तरुणीचा पाच तरुण पाठलाग करत असल्याचं चित्र आहे. यावेळी स्कूटरवरून निघालेल्या मुलीला दोन्ही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न हे तरुण करत असल्याचंही दिसत आहे.
यावेळी पीडित तरुणी, काही लोक आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतरही, शांत आणि पाठलाग करणाऱ्यांना प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले. एकाने तर तिचा पाय तिच्या स्कूटरच्या मागच्या बाजूला ठेवला. ही संतापजनक घटना गजबजलेल्या रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी पाहिली. धक्कादायक घटनेची पोलिसांनी तत्काळ दखल घेत कारवाई केली.
मला हलक्यात घेवू नका, तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटकामध्ये बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशारा
घटनेचं ठिकाण आणि व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला व्यस्त रस्ता सुरुवातीला अस्पष्ट होता. परंतु, नंतर पोलीस आयुक्तालय आग्राने या प्रकरणात दोन अटक केल्याची घोषणा केली तेव्हा त्याची ओळख पटली. दरम्यान, आग्रा पोलीस आयुक्तालयाने याबाबत एक्सवर पोस्ट करत कारवाईबाबत माहिती दिली आहे. स्कूटरवरून जात असलेल्या तरुणीचा पाठलाग आणि छेडछाड करण्यासंबंधीच्या व्हायरल व्हिडिओची तात्काळ दखल घेत पोलिसांनी कारवाई केली.
आता तरुणींना रस्त्यावर फिरणंही कठीण झालं आहे अशी स्थिती आहे. आग्रा येथून एका तरुणीची छेडछाड करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.#viralvideo #agrapolice pic.twitter.com/DyGoobDUNA
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 20, 2024
—
स्कूटी सवार युवती का पीछा कर परेशान करने से सम्बन्धित वायरल वीडियो का त्वरित संज्ञान लेकर #थाना_छत्ता की एन्टी रोमियो टीम द्वारा तत्काल अभियोग पंजीकृत कर 02 अभियुक्तों को किया गिरफ्तार एवं कब्जे से मोटर साइकिल बरामद।#UPPolice pic.twitter.com/vA3ejy7Gtr
— POLICE COMMISSIONERATE AGRA (@agrapolice) August 19, 2024