“अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर एलन मस्क…” डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
US Election 2024 : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक जवळ येत (US Presidential Election) आहेत. यातच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) मोठी घोषणा केली आहे. जर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष (US Election 2024) झालो तर टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांना (Elon Musk) कॅबिनेट मंत्रिपद किंवा व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार पदावर नियुक्ती देऊ अशी मोठी घोषणा ट्रम्प यांनी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एलन मस्कने ट्रम्प यांची एक मुलाखत घेतली होती. या दरम्यान ट्रम्प यांनी मस्कच्या कारचे कौतुक केले होते.
द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार सन 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत जो बायडन यांना (Joe Biden) समर्थन दिल्याचे मस्क म्हणाला होता. आता मात्र मस्क ट्रम्प यांना समर्थन देत आहे. ट्रम्प यांच्यावर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एलन मस्कने सोशल मिडियावर पोस्ट लिहीत मी पूर्णपणे ट्रम्प यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते.
युक्रेन अन् इस्त्रायल युद्धाला बायडनच जबाबदार; एलन मस्कच्या मुलाखतीत भडकले ट्रम्प
रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर निवडणुकीत विजय मिळाला तर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी साडेसात हजार डॉलर्सचे टॅक्स क्रेडिट रद्द करण्यावर नक्कीच विचार केला जाईल. तसेच मस्कना कॅबिनेट मंत्रिपद किंवा सल्लागार पदी नियुक्ती दिली जाऊ शकते.
न्यूयॉर्क आणि पेंसिल्वेनिया येथे प्रचारादरम्यान ट्रम्प म्हणाले, टॅक्स क्रेडिट आणि टॅक्स इंसेंटिव्ह चांगली आयडीया नाही. मस्क यांना कॅबिनेटमध्ये नक्कीच सामावून घेऊ कारण मस्क एक हुशार माणूस आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर मस्कने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. फोर्ब्सनुसार एलन मस्क सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
..तर इस्त्रायलवर हल्ला झालाच नसता
काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी घेतलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इस्त्रायल हमास युद्धाचा (Israel Hamas War) उल्लेख केला. युद्धाला तोंड फुटले त्यावेळी जर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर इस्त्रायलवर कधीच हल्ला झाला नसता. मी राष्ट्रपती असताना मला याची पूर्ण जाणीव होती की इराण (Iran) सगळ्या बाजूंनी घेरला गेला आहे. आतंकवादाला पोसण्यासाठीही इराणकडे पैसे नव्हते, असा धक्कादायक खुलासा ट्रम्प यांनी केला.
माझा मुलगा जागृत मनाच्या विषाणूने मारला गेला; एलॉन मस्कची ‘वेक माइंड व्हायरस’वर संतप्त प्रिक्रिया
मुलाखती दरम्यान ट्रम्प यांनी निवडणूक रॅली दरम्यान झालेल्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले, मला अचानक समजलं की गोळी झाडली गेली आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की कानाला गोळी लागली आहे. या घटनेवरून मला इतकंच म्हणाचंय की जे लोक देवावर विश्वास करत नाहीत त्यांनी आता देवावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करावी.