Aadhar Pan Card Link : आज प्रत्येक व्यवहारासाठी आधार (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) ही कागदपत्रे प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बनली आहेत. मात्र, आता आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्यासाठी केवळ तीन दिववसांचाच कालावधी उरला आहे. या उर्वरित दिवसांत तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्य लिंक केल्यास तुमच्या मेहनतीचे हजार रुपये वाचवता येऊ शकतील.
आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी केंद्रातर्फे 31 मार्च शेवटची तारखी आहे. 1 एप्रिलपासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. या कालावधीत जर तुम्ही तुमची ही दोन्ही कागदपत्रे एकमेकांशी लिंक न केल्यास तुम्हाला हजार रुपयांचा दंड भरवा लागेल.
एवढेच नव्हे तर, पॅन आधार कार्डशी लिंक न केल्यास ते तुम्हाला भविष्यात कोठेच वापरता येणार नाही. कारण प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता आणि शेवटच्या दिवसापर्यंत वाट न बघता आजच तुमचे आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करून घ्या.
जर तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केलं नाही तर, तुमचे पॅन कार्ड काहीही उपयोगाचं ठरणार नाही. आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे, त्याशिवाय अनेक कामे होऊ शकत नाहीत. विशेषत: रिटर्न आणि आयकर भरण्याशी संबंधित कोणतेही काम पॅनकार्डशिवाय करता येत नाही. त्यामुळे लगेचच पॅन-आधार लिंक करा. 31 मार्च नंतर आधार-पॅन लिंक करण्यासाठी 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल.