आशुतोष रांकाला सोडा नाही तर..,; अभिजित दीपकेंचा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमांना अल्टिमेटम!

आशुतोष रांका यांना ताब्यात घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांनी थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमांना अल्टिमेटम दिलायं.

Abhijit Dipke

Abhijit Dipke

Abhijit Dipke : आसामच्या गुवाहाटीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या 30 प्रादेशिक स्वयंसेवकांसह सहसंस्थापक आशुतोष रांका (Aashutosh Ranka) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेवरुन कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना अल्टिमेटमच दिला आहे. आशुतोष रांकाला सोडले नाही तर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आसाममध्ये आंदोलन करण्याचा दमच दीपके यांनी हिमंत बिस्वा सरमा यांना भरला आहे. दीपके यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.

आशुतोष रांका यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दीपके यांनी चांगलाच संताप व्यक्त केला असून आशुतोषला आसाम पोलिसांनी एका खाजगी निवासातून ताब्यात घेतलं आहे. रांका याला कोणत्या आरोपांखाली ताब्यात घेतलं, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही, असं ट्विटमध्ये दीपके यांनी स्पष्ट केलंय. रांका यांनीही आसाम पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पोलिस सकाळपासूनच गुंडासारखे वागत होते. आम्ही एका खाजगी निवासस्थानी शांततेत बैठक घेत होतो, परंतू पोलिसांनी आमच्या टीमच्या सदस्यांना ताब्यात घेतलं असल्याचा आरोप रांका यांनी केला आहे.

सीजेपीची प्रादेशिक स्वयंसेवकांची ही बैठक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता गुवाहाटीतील आठगाव येथील ‘असम श्री परशुराम सेवा सदन’ येथे होणार होती. मात्र, आयोजकांनी आरोप केला आहे की, मूळ ठिकाणचे बुकिंग रद्द करण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांकडून प्रचंड दबाव आणला गेला. त्यामुळे बैठकीचे ठिकाण बदलून आसाम सचिवालयासमोर ‘चौधरी टीला’ येथे करण्यात आले होते. तरीही पोलिसांनी कार्यकर्त्यांची पकडापकडी सुरूच ठेवली.

डॉक्टरला मारहाण प्रकरण भोवलं, रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द, 3 दिवसांत शरण येण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

दरम्यान, आसाम पोलीस आणि प्रशासन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देत म्हटले की जर आमच्या कार्यकर्त्यांची सुटका झाली नाही, तर मी सीजेपीच्या सर्व सदस्यांसह आसाम गाठणार असल्याचा इशारा दीपके यांनी दिला आहे.

Exit mobile version