AC Cabin : आता ट्रक ड्रायव्हरचं आयुष्यही होणार ‘ठंडा ठंडा कूल कूल’

AC Cabin : आता देशातल्या ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य ठंडा ठंडा कूल कूल होणार आहे. कारण केंद्र सरकारने ट्रक ड्रायव्हरसाठी एका दिलासादायक निर्णय घेतला आहे. ट्रक कंपन्यांना केबिनमध्ये एसी लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ट्रक ड्रायव्हरचा प्रवास सुखकर होणार आहे. Manipur Violence : हिंसाचारामुळे देशाच्या आत्म्याला खोल जखम; सोनिया गांधींचे व्हिडिओच्या माध्यतातून शांततेचं आवाहन […]

Truck Ac Cabin

Truck Ac Cabin

AC Cabin : आता देशातल्या ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य ठंडा ठंडा कूल कूल होणार आहे. कारण केंद्र सरकारने ट्रक ड्रायव्हरसाठी एका दिलासादायक निर्णय घेतला आहे. ट्रक कंपन्यांना केबिनमध्ये एसी लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ट्रक ड्रायव्हरचा प्रवास सुखकर होणार आहे.

Manipur Violence : हिंसाचारामुळे देशाच्या आत्म्याला खोल जखम; सोनिया गांधींचे व्हिडिओच्या माध्यतातून शांततेचं आवाहन

विदेशातल्या अनेक वाहनांमध्ये मोठ-मोठ्या कंपन्या ड्रायव्हरसाठी केबिनमध्ये एसीची सुविधा देत आहेत. भारतातील कंपन्या ही सुविधा देत नसल्याने यासंदर्भातील आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

गणेश कारखान्यातील पराभवानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया, ‘प्रवरामध्ये सत्तांतर झाले तर…’

ट्रक कंपन्यांना आता ट्रकच्या केबिनमध्ये एसी लावणे बंधनकारक असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली असून देशभरातील ट्रकमध्ये असा बदल करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असंही ते म्हणाले आहेत. २०२५ पर्यंत सर्व कंपन्यांनी आपल्या ट्रकमध्ये याप्रमाणे बदल करून घ्यावेत, असं गडकरींनी स्पष्ट केलं.

Ashes Series: थरारक सामन्यात कांगारू ठरले भारी, कमिन्स-लायन विजयाचे शिल्पकार

उन्हाळ्यामध्ये तापमान अधिक असल्याने ट्रक ड्रायव्हरचे अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मी मंत्री झाल्यापासून ट्रक केबिनमध्ये एसी लावण्यासंबंधी मागणी करत होतो. मात्र, यामुळे ट्रकच्या किंमती वाढतील असं म्हणून काही लोक याला विरोध करत होते. आज मी एसीच्या सक्तीबाबत आदेश जारी केला असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ट्रकच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ होणार असली तरी रस्त्यांवर वाहतूक करीत असताना ट्रक ड्रायव्हरचे होणारे हाल या निर्णयामुळे होणार नाहीत. पर्यायी रस्त्यांवरील होणाऱ्या अपघाताना आळा बसणार असल्याचं मत ट्रक ड्रायव्हरकडून व्यक्त केलं जात आहे.

Exit mobile version