गणेश कारखान्यातील पराभवानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया, ‘प्रवरामध्ये सत्तांतर झाले तर…’
Ganesh Cooperative Factory Election : राहाता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विखे पितापुत्रांना (Radhakrishna Vikhe) त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन धोबीपछाड दिला आहे. गणेशच्या निकालानंतर खासदार सुजय विखे यांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून आमच्या विरोधात राहिला आहे. या पराभावाची चर्चा करण्यासारखे काही नाही. प्रवरामध्ये सत्तांतर झाले असते तर चर्चा होऊ शकते, असे सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी सांगितले.
सुजय विखे म्हणाले की गणेश सहकारी कारखान्याच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत कारखाना आमच्या विरोधातच राहिला आहे. त्यामुळे नवीन काही घटना घडली आहे असे काही नाही. अनेक निवडणुका पंधरा वीस वर्षांपासून लढवल्या आहेत. त्यामध्ये नेहमी हा कारखाना आमच्याविरोधात राहिला आहे. मागचा एक अपवाद वगळता कारण आम्ही करारामध्ये होतो. त्यानंतर एकच कौल आम्हाला मिळाला होता. या अगोदर 25 वर्षे हा कारखाना विरोधात राहिला आहे. त्यामुळे चर्चा करण्यासारखे नाही. प्रवरामध्ये काही सत्तांतर झाले असते तर चर्चा होऊ शकते.
‘रामदास कदमांना राष्ट्रवादीत जायचं होतं पण संजय राऊतांनी थांबवलं’
पराभवाचे कोणतेही आत्मपरिक्षण करण्याची गरज नाही. नऊ वर्षे भाडेतत्वावर कारखाना अत्यंत प्रमाणिकपणे चालवला. गुंतवणूक केली, यशस्वी गाळप हंगाम पार पाडले. कदाचित सभासदांना वटाले असेल की आपल्याला सत्ता परिवर्तन केलं पाहिजे ते त्यांनी केलं. अशा घटना अनेकवेळा झाल्या आहेत. त्यामुळे ही घटना काही मोठी नाही. आम्ही प्रमाणिकपणे केलेल्या कामाचे रुपांतर मतदानांमध्ये होईल असे वाटले होते पण झाले नाही, असे सुजय विखे यांनी सांगितले.
शिवसैनिकांच्या कामाची टक्केवारी खाणारा…; ठाकरेंच्या निकटवर्तीयानेच सुनावले खडे बोल
सहकार जिवंत ठेवण्याची आपली भूमिका आहे. सहकार जिवंत राहिला पाहिजे. सभासदांना काय योग्य वाटतं? त्यांना कोणाकडून अपेक्षा आहेत हे मतदानांद्वारे सांगू शकतात. म्हणून सभासदांनी कौल दिलेला आहे. हा कौल मान्य करुन पुढं जायचं आहे, असे सुजय विखे म्हणाले.