‘रामदास कदम यांना राष्ट्रवादीत जायचं होतं, पण… : सुनिल राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sunil Raut vs Ramdas Kadam : “संजय राऊत कोण आहेत? शिवसेना आम्ही बनवली तेव्हा संजय राऊत नव्हते. संजय राऊत यांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं की ते राष्ट्रवादीचे आहे की शिवसेनेचे आहेत?” असं म्हणतं शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना (UBT) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू शिवसेना (UBT) आमदार सुनिल राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुनिल राऊत म्हणाले की, रामदास कदम जे बोलतात ते मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं. पण मी त्यांना विचारतो की, “त्यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं. ज्यावेळी आपण आमच्या घरी यायचात त्यावेळी संजय राऊत यांना सांगायचे की मला राष्ट्रवादीमध्ये जायचं आहे. आपण शरद पवारांशी बोलून घ्या. आपण पवारसाहेबांशी बोललात तर माझं राष्ट्रवादीमध्ये योग्य बस्तान बसेल”. अशी वारंवार संजय राऊत यांच्याकडे मागणी केली होती, असा गौप्यस्फोट सुनिल राऊत यांनी केला.
‘मला माहिती नाही’; मुंबईतील ईडीच्या सत्रावर फडणवीसांचं मौन
संजय राऊत यांनी रामदास कदम यांना वारंवार सांगितलं की शिवसेना सोडण्यात काही अर्थ नाही. तुम्ही शिवसेनेत राहा. तुमचं भविष्य शिवसेनेतच आहे. पण आज रामदास कदम निष्ठेच्या गोष्टी करत आहेत पण त्यांना शिवसैनिकांना आणि संजय राऊत यांना निष्ठा शिकवण्याची गरज नाही, असे सुनिल राऊत यांनी रामदास कदम यांना सुनावले आहे.
भारताला तोडण्याचा मोठा कट; मोहन भागवतांचा रोख नेमका कुणाकडे ?
रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्याकडून निष्ठा शिकावी. ज्यांनी भाजपपुढे गुडघे टेकले नाहीत. झुकले नाहीत. त्यांनी साडेतीन महिने तुरुंगवास भोगला. परंतु ते कोणासमोर झुकले किंवा गुडघे टेकले नाहीत. त्यामुळे निष्ठेच्या गोष्टी रामदास कदमांनी संजय राऊतांना शिकवू नयेत, असे सुनिल राऊत म्हणाले. संजय राऊत हे गेली 35 वर्षे सामनाची दुरा सांभाळत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनासारख्या मोठा पेपरची जबाबदारी संजय राऊत यांच्या हातात दिली. याचा अर्थ त्यांच्यावर या दोघांचा विश्वास होता, असेही राऊत म्हणाले.