Namitha Vankawala : अभिनेत्री नमिता सध्या (Namitha Vankawala) सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. याचं कारण आहे. नमिताबाबत तामिळनाडूत एक (Tamil Nadu) धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. तामिळनाडूतील प्रसिद्ध श्री मिनाक्षी मंदिरात (Meenakshi Amman Temple) दर्शनापासून रोखण्यात आले आणि हिंदू असल्याचा पुरावा माझ्याकडे मागितला गेला असा आरोप अभिनेत्री नमिताने केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी (BJP) सदस्या अभिनेत्री नमिता यांनी सांगितले की मंदिरातील एका अधिकाऱ्याने मला मंदिरात दर्शन घेण्यापासून रोखले आणि मी हिंदू असल्याचा पुरावा माझ्याकडे मागितला. मी हिंदू आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे प्रमाणपत्रही मागितलं. याआधी मी देशातील अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पण असा प्रकार कुठेच घडला नाही. सगळ्यांनाच माहिती आहे की माझा जन्म एका हिंदू कु्टुंबात झाला आहे. माझं लग्न तिरुपतीमध्ये झालं होतं. माझ्या मुलाचं नाव भगवान श्रीकृष्णाच्या नावावर ठेवलं आहे. असे असतानाही एका अधिकाऱ्याने मला अहंकारी वृत्तीत विचारणा केली. माझी जात सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे प्रमाणपत्र मागितलं, अशा शब्दांत नमिता यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
एका बेटावरून तामिळनाडूत निवडणुकीचे वातावरण तापणार? भाजपने काँग्रेसला खिंडीत गाठले !
यानंतर मंदिरातील वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र नमिताने केलेले आरोप नाकारले आहेत. नमिता आणि त्यांच्या पतीला आम्ही रोखले. त्यांना विचारलं की तु्म्ही हिंदू आहात का तसेच त्यांना मंदिरातील परंपरा काय आहेत याचीही माहिती दिली. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर त्यांच्या कपाळावर कु्ंकू लावण्यात आलं. नंतरच त्यांना दर्शनासाठी मंदीरात प्रवेश देण्यात आला. यानंतर नमितांना विचारण्यात आल्यानंतर त्या म्हणाल्या की मला माझी आस्था स्पष्ट केल्यानंतर आणि कपाळावर कुंकू लावल्यानंतरच दर्शनाची परवानगी देण्यात आली.
नमिता म्हणाल्या, मदुराईची यात्रा माझी आध्यात्मिक यात्रा होती. इस्कॉनमध्ये मी कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2024) साजरी करण्यासाठी आले होते. विचारण्याचीही एक पद्धत असते. मला एका कोपऱ्यात वीस मिनिटे वाट पहावी लागली. आम्ही रविवारीच दौऱ्याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. मी चेहऱ्याला मास्क लावला होता कारण जे मला ओळखू शकतील त्या लोकांना त्रास देण्याची माझी इच्छा नव्हती.
तामिळनाडू सरकारमधील हिंदू धार्मिक आणि धर्मार्थ निधी मंत्री पीके शेखर बाबू यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. तसेच संबंधित मंदिर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आता यावर तामिळनाडू सरकार (Tamil Nadu Government) काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नरेंद्र मोदींना 28 पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं.. उदयनिधी स्टालिन यांचे वादग्रस्त वक्तव्य