Download App

Aditya L1 Mission : चंद्रानंतर सूर्याकडे झेप! आदित्य L1 चं आज होणार प्रक्षेपण

Aditya L1 Mission : चांद्रयान 3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने आणखी एक धाडसाची कामगिरी हाती घेतली आहे. संपूर्ण भारतवासियांचे लक्ष वेधणारे आदित्य L1 चे (Aditya L1 Mission) आज प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण तळावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे संचालक एस. सोमनाथ यांनी दिली.

Chandrayaan 3 Moonquake: चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या ‘विक्रम’ने लावला शोध; भूकंपासारख्या..

या मिशनचं काउंटडाऊन कालपासूनच सुरू झालं होतं. आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण केले जाईल. सूर्याचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. सूर्याच्या अचूक कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी या यानाला 125 दिवस लागणार आहेत. पीएसएलव्ही सी 57 हा शक्तीशाली वाहक आदित्य एल1 यानाला घेऊन अंतराळात झेप घेणार आहे. या यानाला अचूक कक्षा गाठण्यासाठी 125 दिवस लागतील, असे सोमनाथ यांनी सांगितले.

पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटरवरील एल1 (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) येथील सौर वारे आणि सूर्याचे प्रभामंडल यांचे निरीक्षण करण्यासाठी आदित्य एल1 ची रचना करण्यात आली आहे. पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वीय बल संतुलित राहतील असे पाच बिंदू आहेत. त्या बिंदूंवरून सूर्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे.

Chandrayan 3 : ‘हॅलो पृथ्वीवासियांनो, लवकरच चांगली….; प्रज्ञान रोव्हरनं पाठवला खास संदेश

या घटकांचा होणार अभ्यास

इस्त्रोचा शक्तीशाली वाहक पीएसएलव्ही 57 मुख्य याना सात पेलोड्स घेऊन सूर्याकडे झेपावेल. सात पेलोड्सपैकी चार स्पेसक्राफ्ट सूर्याचे निरीक्षण करतील. उर्वरित तीन पेलोड्स एल1 (सूर्य पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) बिंदू येथील कणांचा तेथील परिसराचा अभ्यास करतील. या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याचे प्रकाश क्षेत्र, सूर्याच्या बाहेरील थर, सूर्याचे प्रभामंडल, सूर्याचे तापमान, अतिनील किरणे, ओझोनवरील परिणाम या गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे.

येथे पाहा आदित्य एल1 चं प्रक्षेपण

आदित्य एल1 च्या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण हे इस्त्रोच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातूनही थेट प्रक्षेपण पाहू शकाल. डीडी वाहिनीवर सुद्धा थेट प्रक्षेपण पाहता येईल. सकाळी 11.20 मिनिटांनी आदित्य एल 1 सूर्याकडे झेपावणार आहे.

 

Tags

follow us