Download App

पाकचं पाणी बंद मग क्रिकेटचे सामने का? औवेसींचा सरकारला संतप्त सवाल

Asaduddin Owaisi On Operation Sindoor : पाकचं पाणी बंद केलं मग क्रिकेटचे सामने का खेळतोय? असा संतप्त सवाल एमआयएमचे (AIMIM) पक्ष

  • Written By: Last Updated:

Asaduddin Owaisi On Operation Sindoor : पाकचं पाणी बंद केलं मग क्रिकेटचे सामने का खेळतोय? असा संतप्त सवाल एमआयएमचे (AIMIM) पक्ष प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान सरकारला केला. लोकसभेत आजपासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु झाली आहे. 16 तास सुरु चालणाऱ्या या चर्चेत लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देखील भाग घेणार आहे.

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान असदुद्दीन ओवैसी म्हणाले की भारतीय सैन्याने धाडसी प्रत्युत्तर दिले. सैन्याने पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. आम्हाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे. सरकारने म्हटले की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.

असदुद्दीन ओवैसी बोलताना म्हणाले की पाकिस्तानचे उद्दिष्ट भारताला कमकुवत करणे आहे आणि जर आपल्याला या सैन्यांना कमकुवत करायचे असेल तर आपण पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये. जेव्हा आपण पाणी देत नाही, तर पाकिस्तानशी सामना का? जेव्हा आपण म्हणतो की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही तेव्हा माझा विवेक मला हा सामना पाहण्यास सांगत नाही. असं असदुद्दीन औवेसी म्हणाले.

तर आम्ही पाकिस्तानचे 80 टक्के पाणी रोखत आहोत, असे म्हणत आहोत की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही. तुम्ही क्रिकेट सामना खेळाल का? माझा विवेक मला तो सामना पाहण्याची परवानगी देत नाही. या सरकारमध्ये 26 मृतांच्या नातेवाईकांना बोलावून सांगण्याची हिंमत आहे का की आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये बदला घेतला आहे, आता तुम्ही पाकिस्तानशी सामना पाहा. ही खूप खेदाची बाब आहे. पहलगाम कोणी केले? आमच्याकडे 7.5 लाख सैन्य आणि केंद्रीय निमलष्करी दल आहे. हे चार उंदीर कुठून घुसले आणि आमच्या भारतीय नागरिकांना मारले? कोणावर जबाबदारी निश्चित केली जाईल? असं लोकसभेत बोलताना खासदार असदुद्दीन औवेसी म्हणाले.

आशिया कप 2025 साठी वेळापत्रक जाहीर

तर दुसरीकडे नुकतंच एसीसीकडून आशिया कप 2025 साठी वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय संघ 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक समोर आल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी जोर धरत आहे. तर सोशल मीडियावर देखील बीसीसीआयवर जोरदार टीका होताना दिसत आहे. तर आता लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान खासदार औवेसी यांनी देखील भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी केली आहे.

भारतातील McDonald’s बंद करा नाहीतर…, काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा संतापले 

26 पर्यटकांचा मृत्यू

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.

follow us