Download App

Chandrayan 3 : ‘हॅलो पृथ्वीवासियांनो, लवकरच चांगली….; प्रज्ञान रोव्हरनं पाठवला खास संदेश

  • Written By: Last Updated:

Chandrayan 3 : भारताची महत्वकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान – 3 (Chandrayaan – 3) चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकणवारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, इस्रोने मंगळवारी चांद्रयान-3 मोहिमेबाबत नवीन अपडेट दिले आहे. इस्रोने (ISRO) म्हटले आहे की चांद्रयान-3 चे प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover)  योग्यरित्या काम करत आहे आणि आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे.

‘चांद्रयान-3’ च्या विक्रम लँडरसोबत गेलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरून आपली खुशाली कळवली आहे. प्रज्ञान रोव्हरने एक संदेश पाठवला. यामध्ये त्याने पृथ्वीवासियांसंदर्भात भाष्य केले आहे. प्रज्ञान रोव्हरचा संदेश इस्त्रोच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करण्यात आला. “हॅलो पृथ्वीवासियांनो, मी चांद्रयान-3 चा प्रज्ञान रोव्हर. आशा आहे की तुम्ही खुशाल असाल. मी सर्वांना हे सांगू इच्छितो की मी चंद्राची रहस्ये उघडण्याच्या मार्गावर आहे. मी आणि माझा मित्र विक्रम लँडर संपर्कात आहोत. आमची प्रकृती चांगली आहे. सर्वात चांगला परिणाम लवकरच येईल, असं ट्विट केलं.

https://twitter.com/chandrayaan_3/status/1696473346010141148?s=20

दरम्यान, इस्रोने सांगितले की, रोव्हर आता चंद्रावरील रहस्ये शोधण्यात गुंतले असून ते लवकरच काही नवीन माहिती समोर आणणार आहेत.

प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात खड्डा
प्रज्ञान रोव्हर आपल्या उद्दिष्टानुसार चंद्रावर जात आहे आणि तेथून इस्रोच्या शास्त्रज्ञांना अपडेट्स पाठवत आहे. मात्र, रविवारी (२७ ऑगस्ट) प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात अडथळा आला. इस्रोने सांगितले की, रविवारी रोव्हरसमोर सुमारे चार मीटर रुंद खड्डा आला होता. इस्त्रोने सांगितले की, प्रज्ञान रोव्हर विवरापासून तीन मीटर दूर होता, जेव्हा त्याला तिथून परत येण्याची सूचना देण्यात आली आणि रोव्हर दुसऱ्या दिशेने वळला. यानंतर आता रोव्हर नव्या मार्गावर जात आहे.

 

Tags

follow us