Praniti Shinde on Operation Sindoor in Lok Sabha : ऑपरेशन सिंदूर आपण सुरू केलं. (Sindoor) मात्र सेनिकांना अपमानाला सामोर जावं लागलं. कारण कुणी दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष सांगतो की भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध संपलं आहे. हे कुणाच्या आणि कशाच्या आधारावर ते बोलले? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत मोदी सरकारला घेरलं.
हे सगळं होत असताना सरकार विरोधकांच्या पश्नांना उत्तर देत नाही. काय कारण आहे की सरकार माहिती देत नाही? असा प्रश्न उपस्थित करत प्रणिती शिंदे म्हणाल्या, किती आतंकी मारले? कुठं मारले? त्यांच्यासह किती दहशतवादी अड्डे नाहीसे केले हे सगळंच अंधारात का ठेवलं जात आहे? का सरकार याबाबत सविस्तर माहिती देत नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.
Operation Sindoor : 21 पैकी 9 च टार्गेट, किती विमाने पाडली? काँग्रेस खासदार गौरव गोगोई भडकले
कुठल्यातरी महत्वाच्या निवडणुकीच्यावेळी असे हल्ले होतात का? जर याबद्दल सरकार गंभीर असेल तर ज्या ठिकाणी इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला, त्या ठिकाणी न जाता पंतप्रधान एका राजकीय सभेला जातात हे किती दुर्दैवी आहे असंही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या आहेत. तसंच, सेनेतील सैनिकांपेक्षा एक व्यापारी जास्त साहस ठेवतो असं वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधानांबद्दल आम्ही काय अपेक्षा बाळगणार असा टोलाही प्रणिती शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, ऑपरेश सिंदूर झाल्यानंतर म्हणतात की जश्न मनाव. आम्हाला सांगा कशाचा जश्न मनाना है? ज्यावेळी अचानक युद्ध थांबल्याचं दुसरा देश सांगत असेल तर त्याचा आनंद व्यक्त करायचा का? कि जे लोक मारले गेले त्यांना काहीच न्याय मिळाला नाही याचा आनंद व्यक्त करायचा ? असा प्रश्न उपस्थित करत या सरकारला जर अशा घटनांवर विरोधी देशांना, दहशतवाद्यांना काही उत्तर देता येत नसेल तर यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी खुर्ची खाली करावी असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.