Download App

अमेरिकेत मंदीचा धोका, आशियानंतर भारतीय शेअर बाजारही कोसळला

Global Market Sell Off : पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील भारतीय

  • Written By: Last Updated:

Global Market Sell Off : पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील भारतीय बाजारात घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांना मोठा नुकसान होत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या शेअर बाजारात (US Market) विक्रीनंतर जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. आज सकाळी आशियाई बाजारांनंतर भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु झाली आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टॅरिफ धोरणामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत मंदी येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अमेरिकन अर्थव्यवस्था “संक्रमणाच्या टप्प्यात” आहे. असं देखील ट्रम्प म्हणाले. यानंतर गुंतवणूकदारांच्या संभाव्य आर्थिक मंदीबद्दलच्या चिंतेला बळकटी मिळाल्याने आज अमेरिकन, आशियाई आणि भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु झाली आहे. याच बरोबर अमेरिकेतील बाँड उत्पन्नातही घट झाली आहे.

तसेच मेक्सिको, कॅनडा आणि चीनवरील त्यांच्या अस्थिर व्यापार धोरणांमुळे ग्राहकांची मागणी आणि कॉर्पोरेट गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकन निर्देशांक कोसळले न्यू यॉर्कमधील नॅस्डॅकने 2022 नंतरचा सर्वात वाईट दिवस पाहायला आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपन्यांचा रिव्यू घेणारा बेंचमार्क एस अँड पी 500 देखील फेब्रुवारीच्या उच्चांकावरून 8 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर कल डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी 2 टक्क्यांनी घसरली. नॅस्डॅक कंपोझिट 4 टक्क्यांनी घसरून जवळजवळ सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. सोमवारी, S&P 500 चा ट्रेडिंग दिवस 2.7 टक्क्यांनी घसरला. याच बरोबर ट्रम्प यांचे सहकारी एलोन मस्क यांच्या टेस्लाचे शेअर्स जवळपास 15.4 टक्क्यांनी घसरले, तर आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चिप दिग्गज एनव्हीडियाचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक घसरले. मेटा, अमेझॉन आणि अल्फाबेटसह इतर प्रमुख टेक स्टॉक्समध्येही मोठी घसरण दिसून आली.

आशियाई बाजारांची स्थिती वाईट    

मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात जपानचा निक्केई 255 2.5 टक्क्यांनी घसरला, दक्षिण कोरियाचा कोस्पी 2.3 टक्क्यांनी घसरला आणि ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स 200 1.8 टक्क्यांनी घसरला. वॉल स्ट्रीटमधील घसरणीनंतर आशियाई बाजारात विक्री झाल्याने मंगळवारी भारतीय शेअर्सही खाली उघडले.

चॅम्पियन्स ट्रॉफी गमावल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटमध्ये भूकंप, कर्णधारासह ‘हे’ 8 खेळाडू बाहेर

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण

मंगळवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सकाळी 9.40 वाजता, सेन्सेक्स 73,791.37 वर आहे. सेन्सेक्स सध्या 323.80 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी खाली आहे. सध्या निफ्टी 93.60 अंकांनी किंवा 0.42 टक्क्यांनी घसरून 22,366.70 वर आहे.

follow us