Download App

‘होय तो गुन्हा मी केला…’; पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर दानिश अलींनी केलं ट्वीट

  • Written By: Last Updated:

Danish Ali : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली (Danish Ali) यांना शिवागीळ केली होती. यानंतर दानिश अली देशभरात चर्चेचा विषय ठरले. ते दोन-तीन महिन्यांपासून बिधुरी यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी लढत आहेत. मात्र त्यांना त्यांच्याच पक्षाकडून मोठा धक्का बसला आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी अली यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दिला. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर दानिश यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं.

पुण्याचे बँकॉक होतेय, तुमचे नवे पालकमंत्री कुठे आहेत ? संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचले ! 

दानिश यांनी मायावतींनी केलेल्या कारवाईनंतर ट्वीट केलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, मी बहिण मायावतीजींची सदैव ऋणी राहीन. त्यांनी मला बसपाचं तिकीट देऊन लोकसभा सदस्य होण्यास मदत केली. त्यांनी मला बसपाच्या संसदीय पक्षाचा नेताही केलं. त्यांचे अपार प्रेम आणि पाठिंबा मला नेहमीच मिळाला. त्यांचा आजचा निर्णय दुर्दैवी आहे. पण, पक्षाच्या विकासासाठी आणि बळकटीसाठी मी मेहनत घेत होतो. मी कोणतेही पक्षविरोधी काम केलेले नाही. अमरोहाचे लोक याचे साक्षीदार आहेत, असं दानिश यांनी लिहिलं.

RBI Repo Rate | रेपो रेट जैसे थे; सामान्यांचा फायदा की तोटा? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi 

त्यांनी पुढं लिहिलं की, भाजपच्या जनविरोधी धोरणांना आपला विरोध आहे आणि यापुढेही करणार आहे. काही निवडक उद्योगपती जनतेचा पैसा लुटत आहेत, त्याविरोधात मी आवाज उठवला आहे, यापुढेही आवाज उठवत राहीन, हीच खरी जनसेवा आहे. तसे करणे गुन्हा असेल तर मी तो गुन्हा केला आहे आणि मी शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे दानिश अली म्हणाले. अमरोहाच्या लोकांसाठी मी सदैव तत्पर असल्याचे अली म्हणाले.

दानिश यांच्यावर कारवाई का?
दानिश अली यांची काँग्रेसशी वाढती जवळीक बसपाची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. बिधुरी प्रकरणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दानिश अली यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दानिश यांनी राहुल गांधींचे जाहीर आभार मानले होते. राहुल गांधींनी मला पाठिंबा दिल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर युपी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनीही दानिश अली यांची भेट घेतली. काँग्रेसचे नेते एकामागून एक अली यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. हे बसपाच्या वरिष्ठ नेत्यांना खडल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याच बोलल्या जातं.

 

Tags

follow us