Download App

‘नाटू नव्हे हे तर लुटो-लुटो अदानी-मोदींचा फोटो शेअर करत काँग्रेसनं डिवचलं

  • Written By: Last Updated:

Congress Attack On Adani And PM Modi with Looto Looto Picture : RRR च्या नाटू-नाटू या गाण्याला आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय द एलिफंटा व्हिसपर या डॉक्युमेंट्रीलादेखील ऑस्कर मिळाला आहे. या पुरस्कारांनंतर देशभरात आनंदाचं वातावरण असून, आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक असाच आहे. या पुरस्कानंतर देशभरातील नेत्यांनी ट्वीट करत दोन्ही टीमचं कौतुक केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील हे पुरस्कार मिळाल्यानंतर RRR आणि द अलिफंटा व्हिसपर टीमचं कौतुक केले आहे. मात्र, त्यानंतर काँग्रेसकडून आता ट्वीट करत या गाण्याचा आधार घेत अदानी आणि मोदींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या ट्वीटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले आहे. ज्यात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्याऐवजी मोदी आणि अदानींचा फोटो लावण्यात आला आहे.

Oscar Awards 2023: ऑस्कर अवॉर्ड पहिल्यांदा भारताला कधी मिळाला होता, तुम्हाला माहीत आहे का?

एवढेच नव्हे तर, नाटू-नाटू ऐवजी लूटो-लुटो असे लिहिले आहे. अदानी आणि हिंडेनबर्ग वादावरून संसदेत वातावरण तापलेले असतानाच काँग्रेसनं अशाप्रकारे फोटो शेअर केला आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर विरोधी पक्षातर्फे सरकारला वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अडानींविरोधात चौकशीचे मागणी केली आहे.

ऑस्कर मिळाल्यानंतर काय म्हणाले होते राहुल गांधी

दरम्यान, आज नाटू-नाटूला ऑस्कर मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत अभिनंदन केले होते. यात त्यांनी ऑस्कर जिंकल्याबद्दल @EarthSpectrum, @guneetm आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले होते. या दोन महिलांनी वन्यजीव संवर्धनाचे सौंदर्य आणि महत्त्व यांचे हृदयस्पर्शी प्रदर्शन करून भारताचा अभिमान वाढवल्याचे राहुल यांनी म्हटले होते. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या पुरस्कारानंतर भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी तसेच संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

मात्र, आता पुरस्कारानंतर कौतुक करणाऱ्या काँग्रेसनं लुटो-लुटो म्हणतं काँग्रेसनं एकप्रकारे नरेंद्र मोदी आणि भाजपला डिवचण्याचं काम केले आहे. काँग्रेसच्या या टीकेवर आता भाजप नेमकी काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अदानी मुद्यावरून संसंदेत वातावरण तापलेले असतानाच आता काँग्रेसच्या या तिखट टीकेवरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमधील वाद अधिक विकोपाल जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tags

follow us