Lionel Messi Argentine footballer : हॅंडशेकची किंमत 1 करोड, कडेकोट सुरक्षा…मेस्सीच्या स्वागतासाठी दिल्लीत हाय अलर्ट

फुटबॉलचा बादशाहा लियोनेल मेस्सी आज दिवसभर दिल्ली दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यादरम्यान, दिल्लीत सुरक्षेसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आलायं.

Untitle

Lionel Messi Argentine footballer : फुटबॉल जगतातील बादशाह लियोनेल मेस्सी (Lionel Messi ) सध्या भारत दौऱ्यावर आहे. अर्जेटिना संघाचा माजी कर्णधार लियोनेल मेस्सी आज राजधानी दिल्लीत असणार आहे. यावेळी मेस्सीच्या स्वागतासाठी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून मेस्सीला भेटण्यासाठी आणि हॅंडशेक करण्यासाठी काही उद्योग समूहांनी तब्बल 1 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे मेस्सीच्या एका हॅंडशेकची किंमत 1 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचीदेखील भेट घेणार आहेत.

फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची भेट,मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पाहा फोटो

दिल्लीतील लिला पॅलेस हॉटेलमध्ये मेस्सी आणि त्यांची संपूर्ण टीम राहणार असून या सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लिला पॅलेस हॉटेल मेस्सी आणि टीमसाठीच बुक केला असून दिल्लीत विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचा संपूर्ण दिवस विशेष मुलाखती आणि हाय प्रोफाईल कार्यक्रमांनी आयोजित असणार आहे. लीला पॅलेस हॉटेलमध्ये लोकं सुटमध्ये राहणार असून या हॉटेलचा खर्च तब्बल 7 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण-वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!; ‘अडलंय ‘का’ बालनाट्य अव्वल!

विमातळापासून हे हॉटेल अवघ्या ३० मिनिटांच्या अंतरावर असून हॉटेलच्या आजूबाजूच्या ठिकाणांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत मेस्सी आणि टीमसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून काही उद्योग समूहांनी मेसीला भेटण्यासाठी आणि हॅंडशेक करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये खर्च केले आहेत.

दरम्यान, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे सरन्यायाधीश काही खासादरांसह अर्जेटिना टीम आणि मेस्सीशी संवाद साधणार आहे. यामध्ये ऑलिम्पिंकपट्टू, क्रिकेकपट्टू यांचा समावेश असणार आहे.

follow us