Download App

भावाला ६४ वेगवेगळ्या नंबरवरुन ब्लॅकमेलरचे फोन; बहिणीच्या मृत्यूनंतरही दिले १९ लाख रुपये

एका भावाने आपल्या मृत बहिणीच्या मृत्यूनंतरही तिचं नाव खराब होऊ नये म्हणून त्याने १९ लाख दिले. या संतापजनक घटनेने पोलिसही हैराण झाले.

  • Written By: Last Updated:

Blackmailing :  इन्फोसिटी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण समोर आलं आहे. गुजरातच्या गांधीनगरमधील कुडासन इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, एका भावाला तब्बल ६४ कॉलर्सनी त्याच्या निधन झालेल्या बहिणीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल १९ लाख १८ हजार रुपये उकळले.

काय आहे नेमकं प्रकरण?

भावाने ज्या बहिणीसाठी इतके पैसे ब्लॅकमेलर्सला दिले त्या बहिणीचं मागील वर्षी डिसेंबरमध्ये निधन झालं होतं. त्याच्या बहिणीने एम.कॉम आणि बीएडचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर ती एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. त्याशिवाय ती मुलांचे ट्यूशनदेखील घेत होती. २०२३ मध्ये राहत्या भाड्याच्या घरात ती मृतावस्थेत आढळली होती. राजकोटमधील पोलीस स्थानकात त्यावेळी तिच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तिच्याकडे पोलिसांना कोणतीही सुसाइट नोट मिळाली नव्हती. तसंच, तिने नेमकी का आत्महत्या केली? याचीही माहिती तिच्या कुटुंबियांना नव्हती.

बिंग फुटलं! गावात सुरु केली SBI ची बोगस शाखा, अनेकांना लाखो रुपयांचा घातला गंडा

बहिणीच्या मृत्यूनंतर अचानक तिच्या भावाला २३ फेब्रुवारी रोजी एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. त्यात त्याच्या मृत्यू झालेल्या बहिणीचे आक्षेपार्ह फोटो होते. तो बहिणीचे असे फोटो पाहून हैराण होता. त्यानंतर फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीने पैशांची मागणी केली. त्यानंतर त्या भावाने पैसे दिले. एकदा पैसे दिल्यानंतर पुन्हा त्याला सतत व्हॉट्सअॅप कॉल आणि ऑडिओ कॉल येऊ लागले. तसंच त्याला सतत मृत बहिणीचे फोटो पाठवण्यात येत होते. फोटो पाठवून नंतर वेगवेगळ्या यूपीआय आयडीवरुन पैशांची मागणी केली जात होती.

ब्लॅकमेलर्सला दिले

ज्यावेळी भावाने पैसे देण्यास नकार दिला, त्यावेळी त्याला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे तो त्यांना पैसे देत गेला. ६४ नंबरवरुन त्याला कॉल, मेसेज, ऑडिओ पाठवण्यात आले. फेब्रुवारीपासून त्याने ६४ वेगवेगळ्या यूपीआयवर १९ लाख १८ हजार पाठवले. इतके पैसे नसतानाही त्याने मित्रांकडून उधार घेत ब्लॅकमेलर्सला दिले.

अखेर पोलिसांत धाव

तरुण सतत पैसे पाठवल गेला आणि ब्लॅकमेलर्सकडून सतत पैशांची मागणी होतच होती. अखेर याला कंटाळून तरुणाने सायबर क्राईम पोलिसांत संपर्क केला. पोलिसांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याही त्यात जोडला गेला. आता मृत बहिणीच्या फोटोंचा फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे. याच प्रकाराला कंटाळून या तरुणीने आत्महत्या केली असावी असा अंदाज आता पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिचा मृत्यूनंतर त्याच फोटोंवरुन तिच्या भावाला ब्लॅकमेल करत १९ लाख उकळण्यात आले.

follow us