अमित शाहांनी भरला उमेदवारी अर्ज, म्हणाले गांधीनगरमधून उमेदवारी हे माझ….

अमित शाहांनी भरला उमेदवारी अर्ज, म्हणाले गांधीनगरमधून उमेदवारी हे माझ….

Amit Shah Nomination Files from Gandhinagar : देशात लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाचा आज पहिला टप्पा पार पडला. एकीकडे हे मतदान होत असताना देश भरात अनेक उमेदवार दुसऱ्या टप्प्यात होण्याऱ्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एनडीएकडून गुजरातमधील गांधीनगर लोकसभेसाठी आपला (LokSabha Elections) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल उपस्थित होते. गांधीनगर येथे दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे.

 

ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: गांधीनगर या मतदारसंघातील मतदार आहेत. त्या गांधीनगरमधून मी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी यावेळी दिली. तसंच, या मतदार संघाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी पाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी नेतृत्व केलं आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असंही शाह यावेळी म्हणाले.

 

देशाने आम्हाला 10 वर्ष दिली

या लोकसभा निवडणुकीत जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी उस्तुक आहे असा दावाही अमित शाहा यांनी यावेळी बोलताना केला आहे. तसंच, मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मोठं नावलौकिक मिळवलं आहे. यूपीए सरकारने निर्माण केलेली पोकळी भरण्यासाठी देशाने आम्हाला 10 वर्ष दिली असून पुढील पाच वर्षात विकसीत भारताचा पाया घालायचा आहे. त्यामुळे जनतेने प्रचंड बहुमताने मोदींना विजयी करावं असं आवाहनही अमित शाह यांनी यावेळी बोलताना केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube