Download App

क्षणांत मिटलं स्वप्न! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधील क्रू मेंबर्स आणि पायलटची शेवटची श्वासगाथा

Ahmedabad Plane Crash Air India Crew Members And Pilots Story : अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशाला (Ahmedabad Plane Crash) हादरवून टाकले आहे. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांनी कधीही विसरता येणार नाही अशी असह्य वेदना सहन केली आहे. या अपघातात 265 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात 230 प्रवासी, (Air India Crew Members) दोन वैमानिकांसह 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. या अपघातात ज्या वैमानिकांनी आणि क्रू मेंबर्सनी आपला जीव गमावला आहे, त्यांच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या.

सुमित सभरवाल

अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल करत होता. सुमित हा मुंबई पवईचा रहिवासी आहे. कॅप्टन सुमित हा एअर इंडियामध्ये लाइन ट्रेनिंग कॅप्टन (एलटीसी) होता. त्याला 8,200 तासांपेक्षा जास्त उड्डाण करण्याचा अनुभव होता. अपघातानंतर शिवसेनेचे (शिंदे गटाचे) आमदार दिलीप लांडे यांनी सुमित सभरवाल यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, सुमितचे वडील 88 वर्षांचे आहेत. त्यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे त्यांचे वडील घरी एकटेच आहेत. लंडनला जाण्यापूर्वी सुमित आणि त्यांच्यात संवाद झाला. यादरम्यान सुमितने लंडनला पोहोचल्यानंतर फोन करणार असल्याचे सांगितले होते. तीन दिवसांपूर्वीही वडील आणि मुलामध्ये संवाद झाला होता. यादरम्यान सुमितने नोकरी सोडून तुमची सेवा करणार, असं त्याने वडिलांना सांगितलं होतं.

एप्रिल-मे महिन्यात तांदळाच्या निर्यातीत 60 टक्के घट; कारणही हैराण करणारं..

मणिपूरच्या दोन तरूणींचा समावेश

एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्समध्ये मणिपूरच्या दोन तरूणी, लॅमनुंथेम सिंगसन आणि न्गांथोई शर्मा कोंगब्रेलटपम यांचाही समावेश होता. या अपघातात दोघींचाही मृत्यू झाला. लॅमनुंथेम सिंगसन मणिपूरच्या कुकी समुदायाचे होत्या, तर न्गांथोई शर्मा कोंगब्रेलटपम मेईतेई समुदायाचे होत्या. दोघेही एअर इंडियाच्या विमान AI171 च्या केबिन क्रू मेंबर्स होत्या. अपघाताची बातमी मिळताच दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरली. कुटुंबियांना अजूनही विश्वास बसत नाहीये की, त्यांच्या मुली आता या जगात नाहीत.

विक्रांत मेस्सीच्या चुलत भावाचेही निधन  

या अपघातात विक्रांत मेस्सीच्या चुलत भावाचेही निधन झाले आहे. त्याला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. तो अभिनेता विक्रम मेस्सीचा चुलत भाऊ आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीने आज भावाच्या निधनाचं दुःख व्यक्त केलंय. इंस्टाग्राम स्टोरीत एक भावनिक पोस्ट लिहित म्हटलंय की, अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी माझे हृदय तुटत आहे. माझे काका क्लिफर्ड कुंदर यांनी त्यांचा मुलगा क्लाईव्ह गमावला, हे जाणून मला आणखी दुःख झालंय. त्या विमानात तो पहिला ऑपरेशन्स ऑफिसर होता.

Air India Plane Crash : मी जिवंत, मलाच विश्वास बसत नाही; रमेश विश्वकुमारने सांगितला थरारक अनुभव…

दीपक पाठक
याशिवाय अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील बदलापूर येथील दीपक पाठक यांचाही समावेश आहे. दीपक पाठक 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये काम करत होते. ते ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये आपल्या आईवडिलांसह आणि दोन बहिणींसोबत राहत होते. लंडनला जाण्यापूर्वी दीपकने गुरुवारी सकाळी आपल्या आईला फोन केला होत्या. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी दीपकला फोन करायला सुरुवात केली. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, दीपकचा फोन सतत वाजत होता पण कोणीही फोन उचलला नाही. या अपघातात दीपकचा जीव गेला आहे, यावर कुटुंबीयांचा विश्वास बसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या नातेवाईकाचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तटकरे यांचे एक नातेवाईक एअर इंडियाच्या विमानातील क्रूचा भाग होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) महाराष्ट्र युनिटचे प्रमुख सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगितले की, अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानातील वरिष्ठ क्रू सदस्य अपर्णा महाडिक ही त्यांची नातेवाईक आहे. अपर्णा महाडिक ही माझ्या धाकट्या बहिणीची सून आहे. तिचे कुटुंब मुंबईतील गोरेगाव येथे राहते. ते म्हणाले की, माझा पुतण्या (अपर्णाचा पती) देखील एअर इंडियाचा क्रू मेंबर आहे. तो दिल्लीत होता. महाडिक कुटुंबाला या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच अपघात झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाईट AI171 मध्ये अपर्णा महाडिक या विमानात होत्या.

रोशनी सोनघरे

या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या केबिन क्रू सदस्यांमध्ये रोशनी सोनघरे ही देखील होती. रोशनी सोनघरेच्या वडिलांनी सांगितले की, ते शेवटचे 11 जून रोजी रोशनीसोबत बोलले होते. या दरम्यान तिने त्यांना तिच्या लंडनला जाणाऱ्या विमान प्रवासाबद्दल सांगितले होते. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही रोशनीचे वडील आशा सोडत नाहीत. त्यांनी सांगितले की, रोशनीला लहानपणापासूनच एअर होस्टेस व्हायचे होते. त्यांनी त्यांच्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

बाबांना दिलेले वचन अपूर्ण राहिले
या अपघातात एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करणारी मैथिली पाटील हिचाही मृत्यू झाला. पनवेलच्या न्हावा गावातील 24 वर्षीय मैथिली पाटील ही लंडनला जाणाऱ्या विमानाने होती. सकाळी 11.30 वाजता अपघाताच्या काही तास आधी मैथिलीने तिच्या वडिलांशी बोलून सांगितले की, ती लंडन पोहोचल्यानंतर पुन्हा फोन करेल. पण नशिबात काहीतरी वेगळेच होते. मैथिलीच्या गावात शोककळा पसरली आहे. मैथिलीने टीएस रहमान इंटर कॉलेजमधून 12 वी पर्यंत शिक्षण घेतले होते, नंतर एव्हिएशनचा कोर्स केला आणि एअर इंडियामध्ये नोकरी मिळवली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण तिने हार मानली नाही.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या क्रू मेंबर्समध्ये याशिवाय इरफान शेख, नूनथेम सिंगसेन आणि मनीषा थापा यांचाही समावेश होता. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, या अपघातात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे, तर भारतीय वंशाचा एक ब्रिटिश नागरिक बचावला आहे.

 

follow us