Vijay Rupani Dies In Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले (Ahmedabad Plane Crash) असून या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह 242 लोक होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी दिली आहे.
माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. ड्रीमलाइनर विमानने टेकऑफ केल्यानंतर लगेच कोसळले. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात दुसऱ्या रांगेत बसले होते. माहितीनुसार माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या पत्नी अंजली रुपानी लंडनमध्ये आहेत आणि रुपाणी त्यांना परत आणण्यासाठी लंडनाला जात होते. या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची माहिती घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना अहमदाबादला जाऊन विमान अपघातानंतर बाधितांना सर्वतोपरी मदत मिळावी याची खात्री करण्यास सांगितले आहे.
Former Gujarat CM Vijay Rupani passed away
– Gujarat BJP President CR Patil confirms pic.twitter.com/AbGvGQnvZ3
— 2 Foreigners In Bollywood (@2_F_I_B) June 12, 2025
कोण होते विजय रुपाणी
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारमधील येंगेनॉन येथे झाला. म्यानमारमधील राजकीय गोंधळामुळे त्यांचे कुटुंब 1960 मध्ये राजकोटमध्ये स्थायिक झाले. विजय रुपानी यांनी गुजरातच्या सौराष्ट्र विद्यापीठातून बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यांनी भाजपच्या महिला शाखेच्या सदस्या अंजलीशी लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे जो अभियंता आहे आणि एक मुलगी विवाहित आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला.
विजय रुपानी अभ्यासादरम्यान भाजपच्या विद्यार्थी संघटनेत एबीव्हीपीमध्ये सामील झाले. 1971 मध्ये ते संघाशी जोडले गेले. भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षाशी जोडले गेले आहेत. 1976 च्या आणीबाणीच्या काळात ते 11 महिने तुरुंगात होते. 1996 ते 1997 दरम्यान ते राजकोटचे महापौर होते. 1998 मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव बनवण्यात आले. 2006 मध्ये ते गुजरात पर्यटनाचे अध्यक्ष झाले. 2006 ते 2012 दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य झाले.
2013 मध्ये नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ते गुजरात महानगरपालिका वित्त मंडळाचे अध्यक्ष होते. 2014 मध्ये त्यांनी राजकोट पश्चिम येथून आमदारकीची निवडणूक जिंकली. 2014 मध्ये आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री बनवण्यात आले. 2016 मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष झाले. 7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री बनले. त्यांनी 2016 ते 2021 दरम्यान हे पद भूषवले. ते भारतीय जनता पक्षाचे गुजरात पश्चिम येथून आमदार होते. याशिवाय ते भाजपचे राज्यसभा खासदारही राहिले आहेत.
#WATCH | Debris at Air India plane crash site in Ahmedabad; Fire Services and other agencies present at the site
Air India B787 Aircraft VT-ANB, while operating flight AI-171 from Ahmedabad to Gatwick, has crashed immediately after takeoff from Ahmedabad. There were 242 people… pic.twitter.com/zn3ZMsJjCi
— ANI (@ANI) June 12, 2025
विमानात सर्वात सुरक्षित सीट कोणती? कसं केलं जातं रेस्क्यू; जाणून घ्या सर्वकाही