Download App

What Is Mayday Call: अहमदाबादमध्ये विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने कोणाला फोन केला होता?

What Is Mayday Call Pilot Gave Before Accident : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर आज दुपारी एक मोठा विमान अपघात (Ahmedabad Plane Crash) झाला. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI-171 उड्डाणानंतर काही सेकंदातच (Plane Accident) कोसळले. हे विमान बोईंग 787 ड्रीमलायनर होते, ज्यामध्ये गुजरातचे (Gujrat) माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह एकूण 242 प्रवासी होते.

दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर दोन मिनिटांनी, विमानाचा विमानतळाच्या सीमेजवळ स्फोट झाला. एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ विमान कोसळले. विमानाने उड्डाण करताच, पायलटने एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) ला मेडे कॉल (Mayday Call) दिला, परंतु त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यानंतर प्रश्न पडतोय की, मेडे कॉल म्हणजे काय? हा शब्द कुठून आला? यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ या.

Ahmedabad Plane Crash : मदत करा, पंतप्रधान मोदींचे निर्देश, अमित शाह गुजरातला रवाना

‘मेडे कॉल’ म्हणजे काय..?
‘मेडे कॉल’ हा विमानातील आपत्कालीन संदेश आहे. तो विमान गंभीर संकटात असताना आणि प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट देतो. जसे की विमानाचे इंजिन निकामी होणे, विमानात आग लागणे, हवेत टक्कर होण्याचा धोका किंवा अपहरणाचा धोका. यावेळी विमानाचा (What Is Mayday Call Pilot) पायलट रेडिओवर ‘मेडे, मेडे, मेडे’ असे ओरडतो. हा कॉल आंतरराष्ट्रीय स्तरावर सेट केला गेलाय. तो सांगतो की, विमानातील प्रवाशांच्या जीवाला धोका आहे आणि त्वरित मदतीची आवश्यकता आहे.

मेडे हा शब्द 3 वेळा का म्हटले जातो?
या कॉलद्वारे कोणताही पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) आणि जवळच्या विमानांना सूचित करतो की, विमानाला तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. पायलट विमानाच्या रेडिओवर तीन वेळा म्हणतो ‘मेडे, मेडे, मेडे’ असे म्हणतो, जेणेकरून स्पष्ट होतं की, खरंच मोठं संकट आलंय.

‘मेडे’ या शब्दामागे कोणती कहाणी?
‘मेडे’ या शब्दाची उत्पत्ती 1923 मध्ये लंडनमधील क्रॉयडन विमानतळावर झाली. तेथील रेडिओ अधिकारी फ्रेडरिक मॉकफोर्ड यांनी तो सुरू केला. त्यांनी तो फ्रेंच शब्द ‘मायडर’वरून घेतला आहे. याचा अर्थ ‘मला मदत करा’ असा होतो. हा शब्द 1948 मध्ये, तो आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आला, जेणेकरून प्रत्येक देशाचे वैमानिक समान आपत्कालीन शब्द वापरू शकतील.

Ahmedabad Plane Crash : अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

मेडे हा फक्त विमानांसाठी नाही. अनेक देशांमधील सागरी जहाजे, अग्निशमन दल, पोलिस आणि रस्ते वाहतूक संस्था देखील याचा वापर करतात. कधीकधी असे देखील घडते की, संकटात सापडलेल्या विमानाचा किंवा जहाजाचा रेडिओ काम करत नाही. नंतर दुसरे विमान किंवा जहाज त्यांच्या वतीने मेडे रिले कॉल करते. अमेरिकेसारख्या देशांमध्ये, जर कोणी खोटा मेडे कॉल केला तर त्याला 6 वर्षांचा तुरुंगवास आणि 2.5 लाख डॉलर्स (सुमारे 2 कोटी रुपये) दंड होऊ शकतो.

 

follow us