Download App

MIM खासदार असदुद्दीन ओवैसींचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, ‘शरद ‘शादाब’ असते तर…’

नवी दिल्ली : नागालँड निवडणुकीत (Nagaland Elections) सत्तास्थापनेसाठी सुरु असलेल्या घडामोडीवर आता देशाच्या राजकारणात पडसाद उमटू लागले असल्याचे दिसून येत आहे. या निकालावर गरज नसतानाही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी भाजपा प्रणित आघाडी सरकारला पाठिंबा देण्यात आला. यामुळे (MIM) एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी (MP Asaduddin Owaisi) यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे (ncp ) ७ आमदार निवडून आले. यामुळे त्यांनी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. मात्र शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयावर राजकीय वर्तुळात जोरदार टीकेला सुरवात झाली. याविषयी खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जर शरद शादाब असते तर त्यांनाही बी टीम संबोधल असतं. ‘सेक्युलर’ याकरिता अस्पृश्य मानले गेले आहे.

‘मी कधी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला नाही आणि देणार सुद्धा नाही. परंतु दुसऱ्यांदा राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला आहे आणि हे शेवटचे असू शकत नाही असा जोरदार हल्ला त्यांनी केला. तसेच साहेब, त्यांचे मंत्री नवाब मलिक यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांचे समर्थन करतात असा खोचक टोला देखील ओवैसींनी शरद पवारांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांच्या निवेदनावर ओवैसींनी ही खोचक टीका केली.

Raj Thackeray : मनसेचा आज १७ वा वर्धापन दिन, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे काय बोलणार यांची चर्चा?

शरद पवार यांनी नागालँड राज्याच्या व्यापक हिताचा विचार करता मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पक्षाने हा निर्णय स्थानिक पदाधिकारी आणि नवनियुक्त आमदार यांच्या मतावर घेतला. या निवेदनामध्ये भाजपाचा कुठेही उल्लेख करण्यात आला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितल.

नेफ्यू रियो यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानवर कॅबिनेटमध्ये भाजप पक्षाचे ५ तर एनडीपीपीचे ७ मंत्री आहेत. नागालँड निवडणुकीमध्ये रियो यांच्या नेतृत्वात एनडीपीपी भाजपा युतीने विजय मिळवला. रियो यांनी २०१८ मध्ये भाजपाशी आघाडी केली होती. गेल्या निवडणुकीमध्ये या आघाडीने ३० जागांवर विजय मिळवला होता. तर यंदाच्या निवडणुकीमध्ये ३७ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपाने या निवडणुकीमध्ये २० जागांवर तर एनडीपीपीने ४० जागांवर उमेदवार उभे केले होते. यामध्ये भाजपाने १२ आणि एनडीपीपीने २५ जागांवर विजय मिळवला.

Tags

follow us