Download App

Ahemdabad Plane Crash : डोंबिवलीची रोशनी, आकाशात सामावली! 10 बाय 10 च्या खोलीतून घेतली भरारी, पण…

Air Hostess Roshni Songhare Death In Ahmedabad plane Crash : आकाशात उडायचं हे रोशनीचं बालपणीचं स्वप्न होतं, तेच तिच्यासाठी जीवघेणं ठरलं. तिच्या या स्वप्नाला आकाशाचीच नजर लागली. डोंबिवलीच्या हवाई सुंदरीचा (Air Hostess Roshni Songhare) अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालाय. 27 वर्षीय रोशनीला आकाश खूप आवडाचं. फ्लाईट अटेंडंट ही फक्त तिच्यासाठी एक नोकरी नव्हती, तर तिचं प्रेम होतं. तिला आकाश खूप आवडायचं अन् आकाशही तिच्यावर खूप प्रेम करायचं. रोशनी जेव्हा फ्लाईटने कुठे (Ahmedabad plane Crash) जायची, तेव्हा ती त्याबद्दल तिच्या इंस्टाग्रामवर माहिती शेअर करायची. रोशनीचे ‘स्काय लव्हज हर’ या इंस्टाग्राम अकाउंटवर 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती या अकाउंटवर ट्रॅव्हल व्लॉग (Plane Crash) बनवायची.

वडिलांनी दिलं लेकीच्या पंखांना बळ

महाराष्ट्रातील डोंबिवली येथील रहिवासी रोशनी लहानपणापासूनच एअर होस्टेस बनू इच्छित होती, त्यासाठी तिने खूप कष्ट केले. तिचा प्रवास 10×10 च्या खोलीपासून सुरू झाला आणि एअर इंडियाचे केबिन क्रू पर्यंत जावून थांबला. रोशनीच्या वडिलांनी लेकीच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी कोणतीच कसर सोडली नव्हती. दोन वर्षांपूर्वी रोशनी एअर होस्टेस बनली आणि स्पाइसजेटमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर, ती एअर इंडियामध्ये रुजू झाली.

क्षणांत मिटलं स्वप्न! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधील क्रू मेंबर्स आणि पायलटची शेवटची श्वासगाथा

अहमदाबाद विमान अपघाताच्या दोन दिवस आधी रोशनी गावी आली होती. ती तिच्या आजी-आजोबा, काका-काकूंना भेटली होती. तिने गावातील मंदिरात कुलदेवतेचे (कुटुंबाचे देवता) दर्शनही घेतले होते. त्यानंतर, घरी येताच ती पुन्हा कामावर परतली. अन् तिने काल लंडनला जाणारे विमान पकडले. यावर्षी कुटुंब रोशनीचे लग्न ठरवणार होते.

नियतीने अन्याय केला…

अपघातात भाची गमावलेल्या काकांनी सांगितले की, त्यांनी रोशनीच्या आईला अद्याप काहीही सांगितले नाही, कारण तिला बीपीचा त्रास आहे. तिचा धाकटा भाऊ सध्या जहाजावर आहे, तो नौदलात तैनात आहे. अशा परिस्थितीत, फक्त मोठा भाऊ आणि वडील रोशनीचा मृतदेह घेण्यासाठी अहमदाबादला गेले आहेत. रोशनीच्या वडिलांनी सांगितले की, एअर इंडियाचे काही सहकारी त्यांच्या कुटुंबासह अहमदाबादमध्ये आहेत. 26 वर्षीय कुमारी रोशनी राजेंद्र सोनघरेचं तिन जणांचं कुटुंब आहे. ते डोंबिवलीत राहतात. तिचे वडील राजेंद्र धोंडू सोनघरे (वय 50), आई शोभा राजेंद्र सोनघरे (वय 45) आणि तिचा धाकटा भाऊ विघ्नेश राजेंद्र सोनघरे (वय 23).

Ahmedabad Plane Crash : मी खूर्चीसह बाहेर फेकलो गेलो; बचावलेल्या विश्वकुमारने मोदींना काय सांगितलं?

आता आपली रोशनी या जगात नाही, हे ऐकूनच तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकरली आहे. या कुटुंबार दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. नेहमीच आकाशात उडणाऱ्या रोशनीची उडान आता मात्र कायमची थांबली. तिचे मामा प्रवीण सुखदरे यांनी भावना व्यक्त करताना म्हटलं की, रोशनी आमच्या अंगाखांद्यावर खेळली, डोळ्यांसमोर मोठी झाली. तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं… पण नियतीने तिच्यावर अन्याय केला.

 

follow us