Akash Vats Video Viral On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला. एअर इंडियाचे विमान एआय-171, जे बोईंग 787-7 ड्रीमलाइनर होते. अहमदाबादहून लंडन (गॅटविक) जाताना उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच मेघनानी नगरच्या निवासी भागात कोसळले. या अपघातात () 242 प्रवाशांपैकी 242 जणांचा आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी बचावला. दरम्यान, आकाश वत्स या प्रवाशाचा एक व्हायरल दावा बातम्यांमध्ये (Air India Plane Crash) आहे. यामध्ये त्याने त्याच विमानात दिल्लीहून अहमदाबादला जाताना तांत्रिक त्रुटींचा उल्लेख केला आहे.
काही गोष्टींची कमतरता
गुरुवारी एका व्हायरल ट्विटमध्ये आकाश वत्सने दावा केला होता की, त्यानी दिल्लीहून अहमदाबादला त्याच बोईंग 787 ड्रीमलायनरने उड्डाण केले होते, जे एअर इंडियाचे विमान AI171 अहमदाबादहून लंडनला (Akash Vats Video Viral) उड्डाण केल्यानंतर काही तासांतच कोसळले होते. हा मुलगा काल अहमदाबाद येथे झालेल्या विमानातून दिल्ली टू अहमदाबाद असा प्रवास करून आला होता. त्या प्रवासात त्याने काही गोष्टींची कमतरता दाखवली होती. त्याचे व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केल्याचे त्याने म्हटले आहे. नेमका त्याला कोणत्या गोष्टींची कमतरता जाणवली होती. ते आपण पाहूया.
आकाश वत्स व्हिडिओमध्ये म्हटलं की, विमानाने उड्डाण केले तेव्हा मला कोणतीही समस्या दिसली नाही. विमानाच्या बाहेरील फ्लॅप्समध्ये काहीतरी असामान्य असल्याचे मला वाटले. तज्ञ ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. (Air India Plane) क्रूझिंग उंचीवर असताना, मला लक्षात आले की फ्लॅपचा मागील भाग वारंवार वर-खाली होत होता.
#WATCH | #AirIndiaPlaneCrash | Mumbai | Akash Vatsa, who claimed in a viral tweet yesterday that he flew in the same Boeing 787 Dreamliner from Delhi to Ahmedabad, hours before it crashed soon after take off while flying as Air India flight AI171 from Ahmedabad to London, spoke… pic.twitter.com/16cQ1p5Gwk
— ANI (@ANI) June 13, 2025
विमानातील एसीचं…
उड्डाण करण्यापूर्वी जेव्हा विमान जमिनीवर होते, तेव्हा एसी व्यवस्थित काम करत नव्हता. अनेक विमान वाहतूक तज्ञांनी असे म्हटले आहे की, विमानाला चांगला थ्रस्ट देण्यासाठी एसी बंद करणे सामान्य आहे. मी याबद्दल तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण विमान उड्डाणासाठी जवळजवळ तयार असल्याने क्रू घाईत होते. एसी चालू केल्यानंतरही त्याचे तापमान चढ-उतार होत राहिले. उड्डाणानंतर आम्ही शटल बसमध्ये चढलो, तेव्हाही इतर अनेक प्रवाशांनी सांगितले की, बसमधील एसी विमानातील एसीपेक्षा चांगले काम करत आहे.
वायएसआर ते विजय रुपाणी… विमान, हेलिकॉप्टर अपघातात देशाने मोठे नेते गमविले
फ्लाईट व्यवस्थित टेक ऑफ झाली होती. कोणतीच समस्या जाणवली नव्हती. एक प्रवासी म्हणून मला थोडीशी गडबड वाटली. मी फक्त माझं मत दिलं आहे. मी असं म्हटलेलो नाही की, विमान क्रॅश झालं,त्याला मी जो व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकला होता, त्यातील कारणंच आहेत असं नाही, असं देखील आकाशने स्पष्ट केलंय.