पोतराज अन् रेडा घेऊन प्रहारची थेट तहसीलमध्ये धडक! शेवगावमध्ये अनोखे आंदोलन, बच्चू कडूंना पाठिंबा

Prahar Protest With buffalo and Potraj To Support Bachchu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगरले आहे. आंदोलनाबाबत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने आता प्रहारचे कार्यकर्ते (Prahar Protest)राज्यभर आक्रमक होत आहे. यातच शेवगावमध्ये देखील प्रहारच्या वतीने सरकारचा निषेध (Ahilyanagar News) आंदोलन करण्यात आले.
अजितदादा देणार शरद पवारांना मोठा धक्का.. अजित गव्हाणे करणार समर्थकांसह घरवापसी?
सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे उपोषणास बसले आहेत. या आंदोलनास पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ शिदोरे यांच्या (Prahar Protest With buffalo and Potraj) मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसील कार्यालयावर रेडा आणून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोतराज आणि रेडा सोबत घेत सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारने बच्चू कडू यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Ahmedabad Plane Crash : 5 जूनची भविष्यवाणी, 12 जूनला अपघात! ज्योतिषी शर्मिष्ठांचे भाकीत व्हायरल
बच्चू कडूंच्या मागण्यांचे समर्थन
बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. राजकीय वर्तुळातूनही बच्चू कडूंच्या मागण्यांचे समर्थन केलं जात आहे. नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधत संवाद साधला. बच्चू कडूंची प्रकृती आता खालावली आहे. अशातच आरोग्य विभागाच्या पथकाकडून बच्चू कडू यांची तपासणी केली असता कडू यांचे वजन 4 किलोने कमी झाले आहे. आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी केली गेलीय.
बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या काय?
1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.
2. दिव्यांग, विधवा महिलांना रु. 6000 मानध
3. शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान
4. 06 एप्रिल 2023 रोजी च्या इतिबृत्तानुसार शासन निर्णय
5.गोरगरीब समांतर राहणाऱ्या घटकांनाही घरकुल.
6. शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष
7. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 10 लाख आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी
8. रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना 1000 रूपये मजुरी
9. संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण रक्कम
10. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना
11. दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण