शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक; ट्रॅक्टर, ट्रकसह थेट मंत्रालय गाठण्याचा दिला इशारा
Prahar Janshkti Party Aggressive for farmers Will march on Mantralay : प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshkti Party) जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांची (farmers) देयके ही थकीत ठेवले जात असल्याचं म्हणत जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी यासाठी येत्या काळात ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक भरून मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे अशी माहिती यावेळी प्रहारच्या वतीने देण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे तर दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहे. शेतकरी उसाचे बिल व त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला असल्याने आर्थिक हदबल होत आहे. धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक ही कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याची चुकीचे धोरण अवलंबत आहे. या गोष्टीचा निषेध व शेतकऱ्यांना त्यांची थकीत देयके हे तातडीने मिळावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरवेळी संसदेच्या पायऱ्या चढताना जाणीव ठेव; दिल्ली गाजवण्यापूर्वी सुळेंनी सांगितला पवारांचा कानमंत्र
यावेळी बोलताना पोटे म्हणाले की हंगाम सुरू करण्यापूर्वी भाऊ जाहीर न करणे भाऊ जाहीर न करता कारखाने तीन-चार महिने चालवू नये भाव जाहीर केल्याप्रमाणे पैसे न देता एफआरपी कायद्यानुसारच पैसे देणे. तसेच शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक बुडवणाऱ्यांनाच साखर कारखानदारांनाच कर्ज देण्याची चुकीचे धोरणे जिल्हा बँकेकडून आखले जात आहेत. उंदे असूनही उसाला वेळेवर तोड न देता कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणणे एच एन टी मध्ये भ्रष्टाचार असा आरोप देखील यावेळी पोटे यांनी केला.
मराठ्यांनो सावध व्हा! भुजबळ दंगली घडवण्यासाठी लोकांना तयार करतायंत; जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप
जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. आपल्याकडे तक्रारी प्राप्त झाले आहेत. मात्र यावर अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नसल्याने शेतकरी तरी हे हतबल होत चालले आहे. शेतकऱ्यांची देयक वेळी देण्यात येत नसल्याने मुला-मुलींची लग्न शिक्षण दवाखाना इतर घरगुती खर्च भागवतांना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना अंगांना सामोरे जावे लागत आहे.
Akshay Kumar ची आई-वडिलांना अनोखी श्रद्धांजली; वृक्षारोपण मोहिमेचं केलं आयोजन
आज पर्यंत बिल थकवणाऱ्या साखर कारखान्यांनी आणि ऊस बिले देणाऱ्या परंतु पंधरवाडा व्याज 18 टक्के न देण्याच्या भूमिका घेणाऱ्या जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्या विरोधात संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले. मात्र कोणतेही तोच पावले उचलले जात नसल्याने पावसाळी अधिवेशनात नामदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटना जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक टेम्पो यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये मंत्रालयावरती धडकणार आहे.
https://youtu.be/3pVCdgjlM3A?si=Ws34N3EfD_2LNcAx
दरम्यान आम्ही केलेले मागणीच्या आधारे शेतकऱ्यांची त्यांची देयके थकीत ठेवणाऱ्या नगर जिल्ह्यातील काही कारखान्यांवर आता कारवाईचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहे. कुकडी सहकारी कारखाना श्रीगोंदा अगस्ती सहकारी कारखाना अकोले वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी, गंगामाई खाजगी कारखाना शेवगाव यांच्यावर आर आर सी जप्तीची कारवाई यासाठीचा प्रस्ताव देखील साखर आयुक्तांना पाठविलेला आहे असं देखील यावेळी बोलताना प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी म्हटलेले आहे.