Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील 16 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. सपाने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या पत्नी डिंपल यादव (Dimple Yadav) यांना मैनपुरीमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय पक्षाने संभलमधून शफीकुर रहमान बर्क यांना तिकीट दिले आहे. राजधानी लखनऊमधून रविदास मेहरोत्रा यांना समाजवादीने उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांच्या यादीत डिंपल यादव यांच्यासह तीन उमेदवार अखिलेश यादव यांच्या कुटुंबातील आहेत. यामध्ये धर्मेंद्र यादव आणि अक्षय यादव यांच्या नावाचाही समावेश आहे.
‘या’ नेत्यांना तिकीट मिळाले
समाजवादी पार्टीने संभलमधून शफीकुर रहमान बर्क, फिरोजाबादमधून अक्षय यादव, मैनपुरीतून डिंपल यादव, एटामधून देवेश शाक्य, बदायूंमधून धर्मेंद्र यादव, खेरीमधून उत्कर्ष वर्मा, धौराहातून आनंद भदौरिया, उन्नावमधून अनु टंडन, लखनऊमधून रविदास मेहरोत्रा यांना उमेदवारी दिली आहे. तर फारुखाबादमधून डॉ.नवल किशोर शाक्य, अकबरपूरमधून राजाराम पाल, बांदा येथून शिवशंकर सिंग पटेल, फैजाबादमधून अवधेश प्रसाद, आंबेडकर नगरमधून लालजी वर्मा, बस्तीमधून रामप्रसाद चौधरी, गोरखपूरमधून काजल निषाद यांना तिकीट देण्यात आले आहे.
भाजप बहुमताचा आसपासही नाही… तरी तावडेंनी सगल तिसऱ्या वर्षी चंदीगडचे मैदान कसे मारले?
2019 मध्ये भाजपला बंपर जागा
मागील निवडणूक निकालांवर नजर टाकली तर उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजपला बंपर जागा मिळाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. तर समाजवादी पार्टीला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. याशिवाय बसपाने 10 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती, तर अपना दलाला दोन जागा मिळाल्या होत्या.
— Samajwadi Party (@samajwadiparty) January 30, 2024
देशाच्या संसदेतही घुमणार “मोदी-मोदी अन् जय श्रीराम”चे नारे; शिवसेना आणणार प्रस्ताव