Download App

पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्येप्रकरणी 5 पाचही आरोपी दोषी, दिल्ली न्यायालयाचा निर्णय

  • Written By: Last Updated:

Soumya Viswanathan Case : पत्रकार सौम्या विश्वनाथन (Soumya Viswanathan) यांची 2008 मध्ये हत्या झाली होती. त्यांच्या हत्येला 15 वर्षांहून अधिक काळ लोटला. दरम्यान, दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) बुधवारी सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात पाच जणांना दोषी ठरवले. तत्पूर्वी या खटल्यातील युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 13 ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता.

आयकॉनिक काऊच ते कॉफी मग; करण जोहरने दाखवली ‘Koffee With Karan 8’ची पहिली झलक 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार पांडे (Ravindra Kumar Pandey) यांनी 18 ऑक्टोबर रोजी निकाल देताना सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. 6 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्णपणे ऐकून घेतला होता.

30 सप्टेंबर 2008 रोजी हत्या
सौम्या विश्वनाथनची 30 सप्टेंबर 2008 रोजी रात्री उशिरा कारमधून घरी परतत असताना हत्या करण्यात आली होती. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येमागे दरोडा असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. या हत्येप्रकरणी आज न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्रकमार पांडे यांनी सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे.

सौम्या विश्वनाथन हत्या प्रकणात रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी या पाच जणांना अटक करण्यात आली होती. ते मार्च 2009 पासून कोठडीत आहेत. पोलिसांनी आरोपींवर मोक्का लावला होता. मलिक आणि इतर दोन आरोपी, रवी कपूर आणि अमित शुक्ला यांना 2009 मध्ये आयटी व्यावसायिक जिगिशा घोष यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

तर दुसरीकडे जिगिशा घोष यांच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त केल्यानंतर सौम्या विश्वनाथन यांच्या हत्या प्रकणाचा छडा लावल्याचा दावा पोलिसांनी केला होता. 2017 मध्ये, ट्रायल कोर्टाने जिगिशा घोष खून प्रकरणात कपूर आणि शुक्ला यांना मृत्यूदंड आणि मलिक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, पुढच्याच वर्षी उच्च न्यायालयाने जिगिशा हत्याकांडातील कपूर आणि शुक्ला यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. तर मलिकची जन्मठेपेची शिक्षा कायम राहिली.

 

Tags

follow us