Download App

Operation Sindoor : रायफल कनेक्शन अन् फॉरेन्सिक रिपोर्ट, अमित शाहांनी सादर केले संसदेत पुरावे

Amit Shah On Pahalgam Attack Operation Sindoor : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attack)सूड अखेर घेतला गेला आहे. केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन महादेव’ मोहिमेतील (Operation Sindoor) तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्याचेच सूत्रधार होते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी लोकसभेत दिली. त्यांनी या हल्ल्याची एफएसएल तपासणी, शस्त्र तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित स्पष्ट माहिती संसदेत सादर केली.

दहशतवादाचे मूळ पाकिस्तान अन् ही काँग्रेसची चूक, अमित शहांचा हल्लाबोल

अमित शहा यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या रायफलच्या बॅरल आणि शेल्सची चंदीगडच्या एफएसएल (Forensic Science Laboratory) मध्ये तपासणी करण्यात आली. तपासात ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त करण्यात आलेल्या एके-47 आणि एम9 रायफल्स या हल्ल्यातच वापरल्या गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पहलगाममधील 26 पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार असलेले दहशतवादी सुलेमान शाह, अफझल आणि जिब्रान यांनाच ऑपरेशन महादेवमध्ये ठार मारण्यात आले, याची वैज्ञानिक आधारावर पुष्टी झाली आहे.

‘ब्रह्मास्त्रमधील ‘केसरिया’ टीम पुन्हा एकत्र; अयान मुखर्जींच्या ‘वॉर 2’ मध्ये होणार धमाका

ऑपरेशन महादेवची कामगिरी

सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे हे ऑपरेशन राबवले. गुप्त माहितीच्या आधारे झपाट्याने केलेल्या कारवाईत हे तीनही दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून एक M9 अमेरिकन रायफल आणि दोन AK-47 रायफल्स, पाकिस्तानी चॉकलेट्स, मतदार क्रमांक आणि अनेक संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या. एफएसएल तपासणीत स्पष्ट झाले की, ज्या रायफलने पहलगाममध्ये गोळीबार झाला होता, त्याच रायफल ऑपरेशन महादेवमध्ये दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आली आहे. गोळ्या आणि काडतुसेही तशाच होत्या. यासोबत हल्ल्यानंतर सुमारे 1 हजारहून अधिक लोकांचे जबाब, घटनास्थळाची रेखाचित्रं आणि २६ मृतांच्या फॉरेन्सिक रिपोर्टचं मॅचिंग करूनच संपूर्ण निष्कर्षावर सरकार पोहोचलं.

पहलगामपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंतचा प्रवास

लोकसभेत आज झालेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत अमित शहा यांनी सहभागी होत स्पष्ट केलं की, दहशतवाद्यांनी हल्ल्याची जबाबदारी घेताच NIA ला तपास देण्यात आला. देशाचे माजी गृहमंत्री पाकिस्तानला क्लीन चिट का देत आहेत? जर हे दहशतवादी पाकिस्तानचे नव्हते, तर पाकच्या भूमीवरुन हल्ला का झाला? सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई झाली. 20 मिनिटांत झालेल्या या कारवाईत पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांचा खात्मा करण्यात आला. विशेष म्हणजे, या कारवाईत एकाही नागरीकाचा मृत्यू झाला नाही.

 

follow us