Amit Shah Share Market Investment You also get huge profits : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्याकडे असलेल्या संपत्ती बाबतच्या प्रतिज्ञापत्र सादर केले जातात. असंच प्रतिज्ञापत्र देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी देखील सादर केले. त्यानंतर ते प्रचंड चर्चेत आले आहेत याचं कारणही तसेच आहे. संपत्तीच्या विवरणपत्रांमध्ये शाह यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ( Share Market Investment ) केली जात असल्याचं समोर आलं.
तुरुंगात केजरीवालांची हत्या करणार का?; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका
एकीकडे आपण पाहतो की, अनेक लोक शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे जुगार समजतात. अनेक जण तर चुकीच्या मार्गदर्शनामुळे किंवा अभ्यासपूर्ण गुंतवणूक न केल्याने देशोधडीला लागल्याच्या घटना नेहमी पाहायला मिळतात. तसेच सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करून देण्याच्या अमिषाला बळी पडून देखील अनेकांचं प्रचंड अर्थिक नुकसान झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र दुसरीकडे देशाचे गृहमंत्री त्यांच्या संपत्तीपैकी जास्त भाग हा शेअर बाजारातील गुंतवणुकीतून कमावलेला दिसून आला आहे.
देशात मोदी सरकार विरोधात आणीबाणीपेक्षाही मोठी लाट, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे जर अमित शाहंच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असेल तर इतर गुंतवणूकदारांसाठी देखील नक्कीच आशेचा किरण ठरू शकतो. तसेच शाह यांनी गुंतवणूक केलेले शेअर्स इतर गुंतवणूकदारांना देखील नक्कीचं भरघोस नफा मिळवून देणारे आहेत. त्यामुळे कशी आहे शाह यांची शेअर मार्केटमधील गुंतवणूक? त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? जाणून घेऊ सविस्तर…
तिकीट मिळू नये म्हणून कुणी कुणी डाव टाकाला; फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटलांनी सांगितलं
गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी गेल्या पाच वर्षात शेअर बाजारात एकत्रितपणे केलेली गुंतवणूक ही 71 टक्क्यांनी वाढली आहे. 15 एप्रिल 2024 पर्यंत त्यांची गुंतवणूक 37.4 कोटी रुपयांवर पोहोचल्याच शाह यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. त्यांची ही गुंतवणूक त्यांच्या एकूण मालमत्तेच्या तब्बल 57% आहे. तसेच उर्वरित मालमत्ता बचत खाते ठेवी, म्युच्युअल फंड, सोने आणि राष्ट्रीय लघुबचत योजना यासारख्या स्वरूपात आहे.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कमाईत घट; 11 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार करणं ठरलं कठीण
तर शाह दाम्पत्याने शेअर बाजारात केलेली ही गुंतवणूक विविध क्षेत्रांमधील तब्बल 242 कंपन्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे केवळ दहा कंपन्यांमध्ये एक कोटीहून अधिक गुंतवणूक त्यांनी केली. तर कोणत्या आहेत या प्रमुख दहा कंपन्या? ज्यामध्ये शाह दांपत्याने तब्बल एक कोटीहून अधिक गुंतवणूक केली आहे. पाहूयात…
जेलमध्ये जायची वेळ येऊ म्हणून शिंदे रडले, भीतीने पक्ष सोडून पळाले; राऊतांचा गौप्यस्फोट
कोणत्या आहेत या प्रमुख दहा कंपन्या?
कॅनरा बँक, पी अॅन्ड जी हायजिन अँड हेल्थ केअर लिमिटेड, करूर वैश्य बँक लिमिटेड, गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड, लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, एमआरएफ लिमिटेड, भारतीय एअरटेल लिमिटेड, कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड. या कंपन्यांचा समावेश आहे.
पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याबद्दल अजित पवारांच मोठ विधान! म्हणाले, फक्त ही निवडणूक…
शाह यांच्या या गुंतवणुकीवर नजर टाकल्यास लक्षात येतं की, त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये आणि एफएमसीजी समभाग यामध्ये विशेष गुंतवणूक केली आहे. कॅनरा बँक आणि करूर वैश्य बँकेमध्ये त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या 13 टक्के वाटा आहे. तसेच त्यांनी बंधन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या काही उपकंपन्यांमध्ये ही छोटी गुंतवणूक केलेली आहे. तसेच त्यांनी आरोग्य आणि हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थकेअर लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड यांचा समावेश आहे.
प्रेक्षकांना भावला सखी गोखलेचा गोड अंदाज; पाहा फोटो
त्यामुळे त्यांच्या इतर संपत्तीच्या साधनांमध्ये त्यांची शेअर बाजारातील गुंतवणूक जास्त आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत 63 टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. 2019 ला त्यांची संपत्ती ही 40. 3 कोटी होती. जी आता 2024 ला 65.7 कोटी झाली आहे. त्यामूळे तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर शाह यांनी केलेली गुंतवणूक तुम्हाला देखील मार्गदर्शक ठरू शकते.