Download App

अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी! तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केली ‘सेव्हन स्टार’ प्रॉपर्टी

अयोध्या : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच अयोध्यावासी (Ayodhya) होणार आहेत. अयोध्येमध्ये त्यांनी नुकतीच जवळपास 10 हजार स्केअर फूट जमीन खरेदी केली आहे. तब्बल 14 कोटी 50 लाख रुपये मोजून त्यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे. येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. (Amitabh Bachchan has bought 10 thousand square feet of land in Ayodhya for Rs 14 crore 50 lakh.)

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबई स्थित डेव्हलपर आणि ‘द हाऊस ऑफ लोढाचे’ अध्यक्ष अभिनंदन लोढा यांच्या सेव्हन स्टार टाऊनशिप ‘द सरयू’मध्ये जमीन खरेदी केली आहे. तब्बल 51 एकरांमध्ये पसरलेल्या या टाऊनशीपचे लोकार्पणही 22 जानेवारी रोजीच होणार आहे. या प्रोजेक्टपासून अयोध्येतील श्रीराम मंदिर अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर अयोध्या विमानतळ अर्ध्या तासांच्या अंतरावर आहे.

10 वर्षांपूर्वीच्या मदतीची PM मोदींनी ठेवली आठवण : अमेरिकेतील मित्राला राम मंदिर सोहळ्याचे ‘खास’ निमंत्रण

या प्रकल्पातील गुंतवणुकीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘अयोध्येतील ‘द सरयू’मध्ये मी घर बांधण्यासाठी उत्सुक आहे. या शहराला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. अयोध्येतील अध्यात्म आणि संस्कृतीने भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाणारे भावनिक बंध निर्माण केले आहेत. अयोध्येत परंपरा आणि आधुनिकता एकत्र नांदते. तर ‘द सरयू’मध्ये अमिताभ बच्चन यांचे ‘प्रथम नागरिक’ म्हणून स्वागत करताना खूप आनंद होत आहे, अशी भावना लोढा यांनी व्यक्त केली.

Ram Mandir : 1800 कोटींच्या मंदिरासाठी 5 हजार कोटींचं दान; सर्वाधिक निधी कुणी दिला ?

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. देशातील विविध ठिकाणी राम मंदिर सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच साजरा करण्यात यावा, असे आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात येत्या 22 जानेवाारीला दिवे लावून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत.

follow us