भारताचं तेजस फायटर जेट कोसळलं! वाचा, या विमानामध्ये असं काय आहे खास?

LCA तेजस स्वदेशी बनावटीचं 4.5 जनरेशनच फायटर जेट आहे. भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) हे विमान तयार केल आहे.

News Photo   2025 11 21T182618.811

News Photo 2025 11 21T182618.811

दुबई एअर शो’मध्ये आज एक दुर्घटना घडली. (Airplane) भारताचं तेजस फायटर विमान कोसळलं. हा भारतासाठी मोठा झटका आहे. कारण हे भारताचं स्वदेशी बनावटीच विमान आहे. टीव्हीवर या दुर्घटनेची दृश्य पाहताना अनेक प्रश्न निर्माण झाले आणि अनेक भारतीय त्याबद्दल हळहळलेही. नक्की काय आहे या विमानाचं खास असं तंत्र.

LCA तेजस स्वदेशी बनावटीचं 4.5 जनरेशनच फायटर जेट आहे. भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) हे विमान तयार केल आहे. सध्या इंडियन एअरफोर्सकडून या विमानाचा वापर सुरु आहे. या विमानात डेल्टा विंग आर्किटेक्चर आहे. ह्यूमन मशीन इंटरफेस कॉन्सेप्टच्या आधारावर या विमानाची निर्मिती केली आहे. हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास हे विमान सक्षम आहे.

VIDEO : दुबई एअर शोमध्ये मोठा विमान अपघात: उड्डाणावेळी लढाऊ तेजस विमान कोसळले

राफेल, सुखोई 30 एमकेआय, डसॉल्ट मिराज, या फायटर विमानांसह तेजस इंडियन एअरफोर्सच अभिन्न अंग आहे. तेजसची सध्या तीन प्रोडक्शन मॉडल आहेत. तेजस मार्क 1, मार्क 1 ए आणि ट्रेनर वेरिएंट. इंडियन एअर फोर्सने 40 तेजस मार्क 1 आणि 83 तेजस मार्क 1 ए ची ऑर्डर दिली आहे.

HAL ने एचएफ-24 मारूत नंतर तेजस एलसीए (लाइट कॉम्बेट एअरक्राफ्ट) भारतात बनवलेलं दुसरं फायटर विमान आहे. ही दोन्ही विमानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केली आहेत. तेजसचा एअर फोर्सने आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. लाइट कॉम्बेट एयरक्राफ्ट (एलसीए) कार्यक्रमाची सुरुवात सोवियत संघाच्या मिग-21 फायटर जेटची जागा घेण्यासाठी करण्यात आलेली. वर्ष 2003 मध्ये दिवंगत पंतप्रधान अटल बहारी वाजपेयी यांनी एलसीएला अधिकृत’तेजस’ नाव दिलं.

Exit mobile version