Download App

Train : फक्त एक मेसेज केल्याने TC धावत येईल मदतीला; ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी खास सुविधा

दररोज साधारण दहा कोटींपेक्षा जास्त लोक ट्रेनने प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियासारख्या एखाद्या देशाच्या लोकसंख्येएवढी आहे.

  • Written By: Last Updated:

Railway Helpline : आपण नेहमी ट्रेनमध्ये प्रवास करतो. (Railway) पण कधीतरी असा प्रसंग येतो की आपल्या हक्काच्या सीटवर भलतंच कुणीतरी बसलेलं असतं. अशावेळी आपण त्या व्यक्तीला उठायला सांगतो. (Helpline) उठला तर ठीक नाहीतर मग भांडणाचं मूळ होऊन जातं. हे सगळं टाळण्यासाठी रेल्वेने एक उपाय केला आहे.

भारतामध्ये दररोज साधारण दहा कोटींपेक्षा जास्त लोक ट्रेनने प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियासारख्या एखाद्या देशाच्या लोकसंख्येएवढी आहे. रेल्वेचा प्रवास सोयीचा आणि सुक्षित समजला जातो. कमी अंतराचा प्रवास असो की जास्त अंतराचा, भारतीयांना रेल्वेचा प्रवास परवडणारा असतो.

Mahadev App: महादेव ॲप घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईत अटक; वाचा, नक्की काय आहे हे प्रकरण

ट्रेनमध्ये आरक्षित डब्यांसह जनरल डबेही असतात. जनरल डब्यामध्ये कोणताही प्रवाशी कुठंही बसू शकतो. त्यासाठी कोणताही वेगळा नियम नाही. परंतु, आरक्षित डब्यांमध्ये बसण्यासाठी बुकिंग करावं लागतं आणि जे सीट मिळालं आहे त्यावरुनच प्रवास करावा लागतो. परंतु, अनेकदा सीटवरुन भांडणं होताना दिसून येतात. काही प्रवाशी जबरदस्तीने आरक्षित सीटवर बसतात. जर असा प्रकार कुणासोबत घडला तर भांडत बसायची गरज नाही. तुम्ही एका सोप्या पद्धतीने त्या व्यक्तीला सीटवरुन उठवू शकता.

जो व्यक्ती जबरदस्तीने आरक्षित सीटवर बसला असेल त्याची तक्रार टीसीकडे करता येते. दुसरा सोपा उपाय म्हणजे 139 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करता येतो किंवा रेल्वेची अधिकृत वेबसाईट Rail Madad वर तक्रार करता येते. दरम्यान, त्यांनी 139 नंबरवर मेसेज कसा करायचा हे सांगितलं आहे. त्यामध्ये आपण आपला पीएनआर नंबर टाकून आपल्या सीटची माहिती मेसेजवरुन जाणून घेऊ शकता. त्यानंतर टीसीदेखील तिथे येऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल.

follow us

संबंधित बातम्या