Mahadev App: महादेव ॲप घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईत अटक; वाचा, नक्की काय आहे हे प्रकरण
Saurabh Chandrakar Arrested in Dubai : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर याला दुबईत आज शुक्रवारी (दि. 11 ऑक्टोबर)रोजी अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केलेल्या रेड नोटीसनंतर (आरएन) कथित किंगपिन चंद्राकरला अटक करण्यात आली. बेकायदेशीर बेटिंग आणि जुगाराच्या वेबसाइट्सचा समावेश असलेल्या या घोटाळ्यात जनतेची 5,000 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.
चंद्राकरला ताब्यात घेणं हे सध्या सुरू असलेल्या तपासासाठी महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. ईडी अधिकारी त्याला भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यार्पणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून, एका आठवड्यात चंद्राकर भारतात परत येण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) अटकेची सूचना देण्यात आली आहे.
मोठी बातमी! बलुचिस्तानातील भीषण हल्ल्यात वीस लोकांचा मृत्यू; पाकिस्तानात खळबळ
महादेव ॲप संपूर्ण भारतातील पॅनेल ऑपरेटरच्या नेटवर्कद्वारे ऑपरेट केलं जातं. बेकायदेशीर सट्टेबाजीच्या गोष्टींपासून कथितपणे पैशांची लाँड्रिंग होते. चंद्राकरचे कुख्यात डी कंपनीशीही संबंध असल्याचा संशय आहे. परदेशात दुबईमध्ये बसून सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल हे ॲप भारतात कसं चालवत होते.
बेनामी खात्यांचा वापर
सर्वात पहिलं अनिल आणि सुनील दम्मानी यांच्या मदतीने केवायसीद्वारे मोठ्या प्रमाणात बेनामी बँक अकाऊंट्स उघडण्यात आली. मुख्य संचालक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि पॅनेल ऑपरेटर अथवाकॉल सेंटर ऑपरेटर यांच्या संगनमताने हे बेटिंग सिंडिकेट ॲप चालवण्यात येत होतं. ॲप चालवण्यासाठी छत्तीसगडमधील पोलिस, राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांना भागीदारी देण्यात आली होती.या प्रकरणी तपास यंत्रणांना 90 हून अधिक बनावट बँक खात्यांची माहिती मिळवली आहे. या बनावट खात्यांचा वापर सट्ट्याच्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
या बँक खात्यांबाबतची माहिती घेतली असता त्यात 2000 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यातील 68 बँक खात्यांमध्ये 3.86 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. याप्रकरणी यापूर्वी राजस्थान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून 20 हून अधिक डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आली होती. ही बँक खाती सट्टेबाजी अॅप व्यवहारांसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे.
हवालाद्वारे व्यवहार
दुबईमध्ये स्थित ॲपचे संचालक हवालाच्या माध्यमातून छत्तीसगडमधील अनिल आणि सुनील दम्मानी यांना मोठी रक्कम पाठवत होते. त्यानंतर, हे पैसे छत्तीसगड पोलिसांचे अधिकारी चंद्रभूषण वर्मा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचा आरोप आहे. छत्तीसगड पोलिसांमध्ये तैनात असलेले पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तीपर्यंत हे पैसे ( लाच म्हणून) पोहोचवण्याची जबाबारी वर्मा याच्यावर होती. हवालाद्वारे हे पैसे रायपूर येथील सदर बाजारातील एका ज्वेलर्सकडे पाठवण्यात येत असल्याचा आरोप आहे.
Promoter of Mahadev betting app Saurabh Chandrakar has been arrested in Dubai following an Interpol Red Corner notice issued by the Enforcement Directorate.
— ANI (@ANI) October 11, 2024