मोठी बातमी! बलुचिस्तानातील भीषण हल्ल्यात वीस लोकांचा मृत्यू; पाकिस्तानात खळबळ

मोठी बातमी! बलुचिस्तानातील भीषण हल्ल्यात वीस लोकांचा मृत्यू; पाकिस्तानात खळबळ

Pakistan News : पाकिस्तानतील सतत धुमसत असलेल्या बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात मोठा (Pakistan News) हल्ला झाला आहे. पाकिस्तानात लवकरच एससीओ बैठक होणार आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानात हल्ले वाढले आहेत. त्यामुळे या देशातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानात पुढील पाच दिवसांसाठी विवाह आणि अन्य गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या सरकारने सर्व लक्ष एससीओ बैठकीवर केंद्रीत केलं आहे.

या बैठकीसाठी अन्य देशांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीआधीच पाकिस्तानात हल्ल्यांची मालिकाच सुरू झाली आहे. आताही बलुचिस्तानात मोठा हल्ला झाला आहे. शुक्रवारी पहाटे येथील एका कोळसा खाणीत ग्रेनेडने हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात वीस जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

Pakistan Terror Attack: मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, 8 जवानांचा मृत्यू

या हल्ल्याची माहिती देताना हमायूं खान नासिर यांनी सांगितले की हा हल्ला क्वेटा शहराच्या पूर्व भागातील डुकी परिसरातील एक कोळसा खाणीत झाला. काही हत्यारबंद लोकांनी कोळसा खाणीवर हल्ला केला. या हल्लेखोरांनी रॉकेट आणि ग्रेनेडचाही वापर केला. या हल्ल्यात वीस जणांचा मृत्यू झाला तर अनेक कामगार जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंत पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले बहुतांश लोक पश्तून भाषिक होते. जखमींमध्ये चार अफगाणी नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र हा हल्ला ज्या ठिकाणी झाला तेथे अलगाववादी लोक राहत होते. या गटाकडून स्वातंत्र्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती. खनिज संपत्तीने समृद्ध असणाऱ्या बलुचिस्तानची लूट पाकिस्तान सरकारकडून केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

साडेतीन हजार शाळांना कुलूप; शिक्षण विभागाच्या रिपोर्टने पाकिस्तानात खळबळ

बलूच लिबरेशन आर्मीने सोमवारी सांगितले होते की पाकिस्तानातील सर्वात मोठ्या विमानतळा बाहेर चीनी नागरिकांवर हल्ला केला आहे. पाकिस्तानात सध्या हजारो चीनी नागरिक काम करत आहेत. यातील बहुतांश बेल्ट अँड रोड प्रोजेक्टवर काम करत आहेत. बलुचिस्तानमधील नागरिकांचा या प्रोजेक्टला विरोध आहे. त्यामुळे या प्रोजेक्टवर सातत्याने हल्ले होत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube