Download App

धक्कादायक! बुराडी सामूहिक आत्महत्येची पुनरावृत्ती; एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं जीवन

मध्ये प्रदेशातून कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पाच जणांनी आत्महत्या केली आहे.

Image Credit: Letsupp

Family suicide : धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पती-पत्नी आणि तीन मुलांचा यामध्ये समावेश आहे. (MP) ही घटना मध्य प्रदेशातील अलीराजपूर गावात घडली आहे. (suicide) याबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं दिसत आहे. या घटनेचा अलीराजपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. (Family suicide) राकेश दोडवा (२७), पत्नी ललिता दोडवा (२५) आणि लक्ष्मी (९), प्रकाश (७) आणि अक्षय (५) अशी मृतांची नावं आहेत. सहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (१ जुलै २०१८) बुराडी येथे एका कुटुंबातील ११ सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केली होती.

ठरलं..! ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची राजकारणात एन्ट्री; नार्वेकरांना विधानपरिषदेचं तिकीट

दरम्यान, या कुटुंबाच्या नातेवाईकांनी ही सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत. (३० जून २०१८) रोजी रात्री ठीक १२ वाजता बुराडी येथील चुंडावत कुटुंबातील (हे कुटुंब भाटिया या नावानेही ओळखलं जात होतं.) ११ सदस्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला हे हत्याकांड असल्याचे दावे केले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार या सर्वांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं.

मोठी बातमी! केनियामध्ये करविरोधी आंदोलनात 39 जण ठार, भारतीय दुतावासाच्या महत्वाच्या सुचना

कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना गळफास घेण्यास मदत केली होती. कोणाच्याही शरिरावर जबरदस्ती करण्यात आल्याचा पुरावा सापडला नव्हता. रात्री ठीक १२ वाजता या सर्व सदस्यांनी आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरात ११ मृतदेह सापडले. या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती ललित भाटिया याने अंधश्रद्धा, जादूटोण्याच्या प्रभावाखाली येऊन त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असल्याचं पुढे पोलीस तपासांत उघड झालं. ललित भाटियाच्या मनोविकारामुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला.

follow us

वेब स्टोरीज