Video: शालेय विद्यार्थ्यांचे वर्गातच अश्लील चाळे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दिल्ली नोएडामधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये विद्यार्थी वर्गात अश्लील चाळे करत असल्याचं दिसतय.

Video: शालेय विद्यार्थ्यांचे वर्गातच अश्लील चाळे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Video: शालेय विद्यार्थ्यांचे वर्गातच अश्लील चाळे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

 Noida Students Video : दिल्ली नोएडामधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वर्गातच अश्लील चाळे करत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Noida) त्यावरून आता चांगलच वातावरण तापलं आहे. शाळेमध्ये विद्यार्थी असे चाळे करत असतील तर शिक्षक आणि इतर व्यवस्था कुठ गायब झाल्या आहेत अशा प्रकारची टीका होताना दिसत आहे. तसंच. विद्यार्थ्यांच्या वर्तवनुकीबद्दलही चिंचा व्यक्त केली जात आहे.

OTT Platform Ban: अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या 18 ओटीटी, 19 वेबसाइट अन् 10 ॲप्सवर मोठी कारवाई

व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये वर्गात सोबत बसलेले मुलगा आणि मुलगी एकमेकांचा किस घेत असल्याचं दिसत आहे. सर्व विद्यार्थी वर्गात असताना हे सर्व सुरू आहे. तिथल्याचं कुण्या विद्यार्थ्याने व्हिडिओ काढला असून तो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, अनेकांनी या अश्लील वर्तनाबद्दल टीका केली आहे. तसंच, शाळेत काय सुरू आहे याबद्दल शिक्षकांनी सतर्क असायला हव असंही लोकांनी म्हटलं आहे.

Ahmednagar : धक्कादायक! परिक्षेत चांगल्या गुणांची ऑफर देत प्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे अश्लील मागणी

हा व्हिडिओ कोणत्या शाळेतील आहे हे तपासून तीथं नक्की काय चालतं याचा तपास करून त्यावर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी आता पालकांसह नेटकरी म्हणायला लागले आहेत. व्हिडिओ कोणत्या शैक्षणिक संस्थेतील आहे हे स्पष्ट नसल्याने कुणीही काही अंदाज लावला नाही. मात्र पोलिसांनी याची गंभीर दखले घेऊन यामध्ये कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.

Exit mobile version