अंबानींच्या लग्नाची सुरु होती धुमधाम, अचानक घुसले 2 जण अन् …

Anant Radhika Wedding : सध्या सोशल मीडियासह संपूर्ण देशात अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या

Anant Radhika Wedding : अंबानींच्या लग्नाची सुरु होती धुमधाम, अचानक घुसले 2 जण अन् ...

Anant Radhika Wedding : अंबानींच्या लग्नाची सुरु होती धुमधाम, अचानक घुसले 2 जण अन् ...

Anant Radhika Wedding : सध्या सोशल मीडियासह संपूर्ण देशात अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरु आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह अनेक बॉलीवूड (Bollywood) आणि हॉलिवूड (Hollywood) स्टार्सनी हजेरी लावली होती.

तर एक आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अंबानींच्या लग्नात दोन जण विना आमंत्रण दाखल झाले होते. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार मुंबई पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. विना आमंत्रण येणाऱ्यांमध्ये एक जण यूट्यूबर आणि दुसरा व्यावसायिक असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दोन जण विना आमंत्रण दाखल झाले होते. मुंबई पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण व्यंकटेश नरसैय्या अल्लुरी यूट्यूबर आहे तर दुसरा लुकमान मोहम्मद शफी शेख व्यावसायिक आहे. दोघांनाही मुंबईच्या बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लग्नासाठी ते आंध्र प्रदेशातून आले होते. पोलिसांनी आरोपींना नोटीस देऊन सोडून दिले असून दोन्ही प्रकरणांत कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे संपूर्ण देशात अनंत-राधिकाच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. देशाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी शुक्रवारी रात्री मुंबईत राधिका मर्चंट यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या भव्य लग्नाला देश-विदेशातील सेलिब्रिटी, राजकारणी आणि उद्योगपती देखील उपस्थित होते.

Punit Balan : शिवमुद्रा ढोल ताशा पथक वाद्य पूजन सोहळा आणि सराव शुभारंभ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवारी अनंत आणि राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थिती लावली होती. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत आणि राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. यावेळी बॉलीवूडचे स्टार्स आणि वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री देखील उपस्थित होते.

Exit mobile version