Andhra Tarin Accident : आंध्रप्रदेशमध्ये रविवारी सायंकाळी मोठा रेल्वे अपघात (Andhra Tarin Accident) झाला आहे. विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या. विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन विजयनगरम जिल्ह्यात रुळावरून घसरली.
यातील मृतांचा आकडा वाढला आहे. तर हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात कमीत कमी 13 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून घटनास्थळी मोठी गर्दी आहे.
13 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती…
आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये दोन रेल्वेची धडक झाली. एक पॅंसेंजर ट्रेन उभी होती, त्याचवेळी मागून दुसरी पॅंसेंजर ट्रेन आली. मागून आलेल्या ट्रेनने जोरदार धडक दिल्यानं काही डबे रुळावरून घसरले. तर पूर्व मध्य रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर (ट्रेन क्र. 08504) विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर (ट्रेन क्र. 085532) या ट्रेनमध्ये हा अपघात झाला. या दोन ट्रेनच्या धडकेत काही डबे रुळावरून घसरले. घटनास्थळावरूनची काही फोटो समोर आले असून यात रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याचं दिसतं आहे. या अपघातामुळं पॅसेंजर ट्रेनचे तीन डब्बे रेल्वे रुळावरून घसरले असल्याची माहिती आहे. त्यामुळं घटनास्थळी प्रचंड खळबळ उडाली आहे.
Pune Crime : धक्कादायक! घरात घुसला अन्… पुण्यात थरारक खून
दरम्यान या घटनेमुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकुण 18 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर 22 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. विशाखापट्टनम-रायपुर (08528) पॅसेंजर, कोरबा-विशाखापट्टनम, पारादीप – विशाखापट्टनम, रायगड़ा-विशाखापट्टनम, पलासा-विशाखापट्टनम, विशाखापट्टनम-गुनुपुर, गुनुपुर-विशाखापट्टनम, विजयनगरम-विशाखापट्टनम रेल्व रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच आणखी काही गड्यांचा यामध्ये समावेश आगहे. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Maratha Reservation उपसमितीची आज बैठक; सरकार काय निर्णय घेणार?
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी विजयनगरम येथे झालेल्या रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच, या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तातडीने मदत करण्याचे आणि जवळच्या गावातून जास्तीत जास्त रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.