Goat Farming : शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Goat Farming) बातमी आहे. केंद्रीय संस्थानने (CIRG) एक खास स्मार्टफोन आधारित AI ॲप विकसित केले आहे. या ॲपचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या ॲपच्या मदतीने शेतकरी त्यांच्याकडील शेळ्यांचे वजन आणि अंदाजित रक्कम याची माहिती घेऊ शकतात.
शेतकऱ्यांनी शेळीचे तीन वेगवेगळ्या अँगलने फोटो मोबाईलमध्ये काढायचे आहेत. नंतर हे ॲप शेळ्यांच्या फोटोंच्या आधारावर शेळीचे वजन किती आहे याची अचूक माहिती देईल. या टेक्निकमुळे आता शेळ्यांचे वारंवार वजन करण्याची गरज राहणार नाही. CIRG चे निर्देशक डॉ. मनीष कुमार चटली यांच्या नुसार पुढील तीन ते चार महिन्यांत हे ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहील. त्या बरोबरच या ॲपचा वापर करणे सुद्धा खूप सोपे राहील. या ॲपच्या मदतीने शेळीपालन अधिक वैज्ञानिक आणि व्यवस्थितपणे करता येईल.
Government schemes : शेळीपालन अन् कुकुटपालनासाठी मिळणार 25 लाखांचं अनुदान, कोणाला मिळणार फायदा?
या ॲपमुळे शेळीच्या वजनाच्या आधारे योग्य किंमत निश्चित करणे शक्य होणार आहे. यामुळे व्यवहारात पारदर्शकता येईल आणि फसवणुकीचे प्रकार कमी होतील. अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होईल. कारण या शेतकऱ्यांना नेहमीच त्यांच्या शेळ्यांचे योग्य पैसे मिळत नाहीत.
भारतात आजमितीस 15 ते 16 कोटी शेळ्या आहेत. यातील 12 कोटी शेळ्या मांस उत्पादनासाठी पाळल्या जातात. शेळ्यांचा बाजार अजूनही बराचसा असंघटित आहे. येथे बहुतांश व्यवहार संख्येच्या आधारावर होतात. वजन आणि गुणवत्तेचा विचार केला जात नाही. या अँपच्या माध्यमातून हे असंतुलन बंद होईल.
ब्लॅक बंगाल जातीच्या शेळ्यांचे वजन वेगाने वाढत जाते. या शेळ्यांचे मांस गुणवत्तेत चांगले असते. या प्रजातीची शेळी पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड या राज्यांत प्रामुख्याने आढळते. आता या ॲपच्या मदतीने ब्लॅक बंगाल शेळ्यांची योग्य किंमत शेतकऱ्यांना मिळू शकेल. ॲपमुळे शेळीपालनात पारदर्शकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल
Mahadev App: महादेव ॲप घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईत अटक; वाचा, नक्की काय आहे हे प्रकरण