Government schemes : शेळीपालन अन् कुकुटपालनासाठी मिळणार 25 लाखांचं अनुदान, कोणाला मिळणार फायदा?

Government schemes : शेळीपालन अन् कुकुटपालनासाठी मिळणार 25 लाखांचं अनुदान, कोणाला मिळणार फायदा?

Government schemes : राज्याच्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन(Poultry farming), शेळ्या-मेंढ्या, वराह आणि चारा या क्षेत्रामध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेंसाठी ग्रामीण पोल्ट्री फार्मसाठी(Poultry farm) 50 टक्के भांडवली अनुदान मिळते. त्यामध्ये हॅचरी आणि ब्रुडर कम मदर युनिट, मेंढी, शेळी प्रजनन फार्म अशा विविध घटकांसाठी कमाल अनुदान मर्यादा 25 लाख ते 50 लाखांपर्यंत दिले जाते.

Maratha Reservation : घोषणा, भाषणं नाही, लढावच लागणार; उद्यापासून जरांगे पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरणार

योजनेसाठी अर्ज कोण करु शकतो?
– कोणीतीही व्यक्ती
– शेतकरी उत्पादन संस्था
– बचत गट
– शेतकरी सहकारी संस्था
– संयुक्त दायित्व गट
– कलम 8 कंपन्या

आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची मोठी घोषणा ! भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेणार

योजनेसाठी पात्रता काय?
– या योजनेंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने त्या त्या विषयाचे प्रशिक्षण घेतलेले असावे. किंवा त्याला त्याला तांत्रिक अनुभव असावा.
– अर्जदारांना बँक किंवा वित्तीय संस्थांकडून प्रकल्पासाठी मंजुरी मिळणे किंवा शेड्यूल्ड बँकेतून मिळणे आवश्यक आहे.
– अर्जदाराकडे स्वतःची जमीन किंवा भाडेतत्वावर जमीन असणे आवश्यक आहे. जिथे प्रकल्पाची स्थापना केली जाईल.
– केवायसीसाठी अर्जदाराकडे सर्व संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अनुदानाची मर्यादा किती?
– पोल्ट्री प्रकल्प – 25 लाख रुपये.
– मेंढी आणि शेळी – 50 लाख रुपये.
– डुक्कर – 30 लाख रुपये.
– चारा – 50 लाख रुपये.
– जमीन खरेदी/भाडे/व्यक्तिगत वापरासाठी कार खरेदी/कार्यालय सेटिंग इत्यादीसाठी अनुदान दिले जाणार नाही.

या प्रकल्पासाठी उर्वरित 50 टक्के रक्कम ही अर्जदाराला बँक कर्जाद्वारे किंवा NCDC संस्थेकडून कर्जाद्वारे किंवा स्वतः उभी करणे उभी करावी लागेल.

योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
– प्रकल्पात अर्जदाराच्या वाट्याचा पुरावा
– प्रकल्पात जोडलेल्या शेतकऱ्यांची यादी
– अर्जदाराचा पत्ता पुरावा
– शेवटच्या 3 वर्षांचे ऑडिट केलेले आर्थिक विवरण (कंपनीच्या बाबतीत)
– मागील 3 वर्षांचे आयकर विवरण
– मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
– मुख्य प्रवर्तकाचे पॅन/आधार कार्ड
– जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
– प्रशिक्षण प्रमाणपत्र
– अनुभव प्रमाणपत्र
– स्कॅन केलेला फोटो
– स्कॅन केलेली स्वाक्षरी

अर्जदाराने कोणत्याही शेड्युल्ड बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळू शकते. अर्जदार ड्रॉप डाउन लिस्टमधून त्यांच्या आवडीची बँक निवडू शकतात. या योजनेंतर्गत सबसिडीची रक्कम 2 समान हप्त्यांमध्ये दिली जाते. त्याचा पहिला हप्ता प्रकल्पाच्या सुरुवातीला दिला जातो. दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी एजन्सी द्वारे पडताळणी प्रकल्पाची पडताळणी केल्यानंतर दिला जातो.

भांडवल सबसीडी मिळण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या?
– एकात्मिक सायलेज बनविण्याचे यंत्र
– डो चीकिंमत चार बोकडाची किंमत
– वाहतूक खर्च
– पॅरेंट स्टॉकसाठी घरबांधणी शेड बांधणे
– किड शेड आणि सिक पेन
– चारा लागवड
– चाफ कटर
– उपकरणे
– विमा
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube