Download App

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! वंदे भारतसह सर्व AC रेल्वेच्या भाड्यात 25 टक्के कपात

Indian Railways : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही देशाची जीवनवाहिनी मानली जातेय. जागतिक पातळीवरील रेल्वे जाळ्यात भारताचा वरचा क्रमांक लागतो. देशातील कोट्यावधी लोक दररोज रेल्वेनं प्रवास (Travel by train) करतात. तुम्ही देखील ट्रेननं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) सर्व ट्रेन ज्यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या मूळ प्रवासी भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात केली जाईल, अशी घोषणा केली. (Announcement of Railways reduction in tickets for many railways including Vande Bharat)

https://www.youtube.com/watch?v=RhZq-lPLC0s

मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा लाभ रेल्वे प्रवाशांना तातडीने मिळणार आहे. तर, ज्यांनी आधीच बुकिंग केले आहे त्यांना कोणताही परतावा मिळणार नाही. या संदर्भात दिलेल्या आदेशात, रेल्वे बोर्डाने शनिवारी सांगितले की, एसी चेअर कार असलेल्या ट्रेनमध्ये सवलत दर योजना सुरू करण्यासाठी विभागीग रेल्वेकडे अधिकार सोपवले आहेत.

रेल्वे मंत्रालयाने ट्रेनमधील आसन क्षमतेचा पूर्ण वापर करण्याच्या उद्देशाने एसी ट्रेनमध्ये सवलतीच्या प्रवासी भाडे योजना लागू करण्यासाठी विभागीय रेल्वेला अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांच्या संख्येच्या आधारावरच प्रवासी भाड्यात 25 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल.

या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना होणार लाभ

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, ही योजना एसी चेअर कार आणि सर्व एसी ट्रेनमधील एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी लागू असेल. त्यात वंदे भारत, अनुभूती आणि विस्टाडोम ट्रेनचाही समावेश आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकूण प्रवाशांच्या संख्येनुसार भाड्यात 25 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल.

Ind vs Pak ODI World Cup 2023: बाबर आझमचे टीम इंडियाला आव्हान, म्हणाला पाकिस्तानला हरवून दाखवा!

परिपत्रकानुसार, मूळ प्रवासी भाड्यावर जास्तीत जास्त 25 टक्क्यांपर्यंत ही सूट मिळू शकते. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट सरचार्ज, GST यासारखे इतर शुल्क अतिरिक्त आकारले जाऊ शकतात. कोणत्याही क्लास किंवा सर्व क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवाशांच्या संख्येनुसार सूट दिली जाऊ शकते. मागील 30 दिवसांच्या कालावधीत 50 टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी संख्या असलेल्या क्लासवरही सवलतीच्या भाडे योजनेचाही विचार केला जाऊ शकतो. सवलतीचे प्रमाण ठरवण्यासठी वाहतुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या इतर वाहनांचे भाडे विचारता घेतले जाईल.

या सवलतीची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेशात म्हटले आहे. आधीपासूनच आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोणताही परतावा दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही योजना सुट्टीच्या किंवा सणांच्या काळात धावणाऱ्या विशेष गाड्यांसाठी लागू होणार नाही.

दरम्यान, PTOs वरील तिकीटे, रेल्वे पास, डिस्काउंट व्हाउचर, आमदार/माजी आमदार कूपन, वॉरंट, खासदार/माजी खासदार, स्वातंत्र्य सैनिक आदी तिकीटांना सवलत मिळणार नाही.

Tags

follow us