Ind vs Pak ODI World Cup 2023: बाबर आझमचे टीम इंडियाला आव्हान, म्हणाला पाकिस्तानला हरवून दाखवा!

  • Written By: Published:
Ind vs Pak ODI World Cup 2023: बाबर आझमचे टीम इंडियाला आव्हान, म्हणाला पाकिस्तानला हरवून दाखवा!

Babar Azam  challenge to Team India : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सुरू होण्यास तीन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. यंदाचा विश्वचषक भारताच्या भूमीवर 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. भारत प्रथमच एकट्याने वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. यापूर्वी 1987, 1996 आणि 2011 विश्वचषकाचे संयुक्तपणे आयोजन केले होते. (Babar Azam’s challenge to Team India, said to defeat Pakistan!)

या स्पर्धेतील सर्वात ब्लॉकबस्टर सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या सामन्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बाबर म्हणाला की, आपल्या संघाला विश्वचषकाच्या सामन्यात भारताचा पराभव करायचा आहे, मात्र उर्वरित सामन्यांमध्येही चांगली कामगिरी करून विश्वचषक जिंकण्यावर आपले लक्ष आहे.

आम्ही फक्त भारताशीच खेळणार नाही : बाबर

बाबर आझम म्हणाला, ‘आम्ही विश्वचषकात फक्त भारताविरुद्ध खेळण्याचा आणि जिंकण्याचा विचार करत नाही. आयसीसीचे जेतेपद मिळवायचे असेल, तर प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल, आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही केवळ भारतासोबत खेळणार नाही तर विश्वचषक भारतात खेळणार आहोत.

कथा महाराष्ट्राच्या राजकारणाची अन् षडयंत्र-कट-कारस्थानाची; शरद पवार येणार मोठ्या पडद्यावर

आयसीसी स्पर्धेसाठी पाकिस्तानला भारतात येण्याची अपेक्षा आहे, जरी त्यांचा सहभाग सरकारी मंजुरीच्या अधीन आहे. बाबर म्हणाले की, खेळाडू या मालिकेसाठी सातत्याने तयारी करत असतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये (पीसीबी) सुरू असलेल्या उलथापालथीचा राष्ट्रीय संघाच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील कामगिरीवर आणि त्यापूर्वीच्या मालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास बाबरला वाटतो.

आमचे पूर्ण लक्ष फक्त क्रिकेटवर : बाबर

पीसीबी अधिकारी आणि निवड समितीमधील अलीकडच्या बदलांचा खेळाडूंवर काय परिणाम झाला आहे, असे विचारले असता बाबर म्हणाले की, त्यांचे काम क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे आहे. बाबर म्हणतो, ‘पीसीबीमध्ये काय चालले आहे याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करतो. आगामी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक आमच्यासमोर आहे आणि आम्हाला माहित आहे की हे सामने जिंकण्यासाठी व्यावसायिक खेळाडू म्हणून आम्हाला काय करावे लागेल.

दुसरीकडे विश्वचषकाबाबत पाकिस्तानने नवा डावपेच सुरू केला आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तान भारतात सुरक्षा शिष्टमंडळ पाठवण्याच्या तयारीत आहे. हे सुरक्षा शिष्टमंडळ ज्या पाच शहरांमध्ये पाकिस्तानचे साखळी सामने खेळायचे आहेत तेथे जाणार आहे. मात्र, भारत सरकार त्या शिष्टमंडळाला भारत भेटीची परवानगी देते की नाही हे पाहावे लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube