Video : आई पुढच्या जन्मी प्रेम दे…, रडत रडत Insta Live अन् अनुराग डोभालचा स्वतः संपवण्याचा प्रयत्न

Anurag Dobhal Accident : बिग बॉस 17 फेम अभिनेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे

Anurag Dobhal Accident

Anurag Dobhal Accident

Anurag Dobhal Accident : बिग बॉस 17 फेम अभिनेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या काही व्हिडिओमध्ये कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहे. तर आता त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली – मिरत महामार्गावर इंस्टाग्रााम लाईव्ह करत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अनुराग डोभाल (Anurag  Dobhal) हाय स्पीडमध्ये दिल्ली – मिरत महामार्गावर (Delhi – Meerut Highway) गाडी चालवत होता. या दरम्यान तो इंस्टाग्रामवर लाईव्ह (UK07 Rider) देखील होता. व्हायरल व्हिडिओमध्ये तो पुढच्या वेळी आई प्रेम दे असं बोलताना दिसत आहे. यानंतर तो हे कदाचित माझं शेवटचं व्हिडिओ असू शकतो, चला शेवटच्या राईडवर असं म्हणतो आणि गाडीचा वेग वाढवतो. यानंतर काही क्षणांत कारचा ताबा सुटतो आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकते. यावेळी अनुराग चाहत्यांशी लाईव्हवर संवाद साधत होता मात्र या धक्कानंतर अचानक लाईव्ह बंद होतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे या अपघातानंतरचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक अनुरागला गाडीतून बाहेर काढताना दिसत असून नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. सध्या अनुरागच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कुटुंबावर गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी अनुरागने यूट्यूबरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले होते की, आंतरजातीय विवाहानंतर आई, वडील आणि भावाकडून मानसिक छळ सहन करावा लागत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये त्याने दावा केला आहे की, सुरुवातीला या लग्नाला कुटुंबाकडून होकार देण्यात आला होता मात्र त्यानंतर पत्नीला घरात प्रवेशही नाकारण्यात आला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना कधी आणि कसा पाहता येणार फ्री; जाणून घ्या सर्वकाही-

कोण आहे अनुराग डोभाल ?

अनुराग डोभाल देहरादूनचा एक कंटेंट क्रिएटर असून तो यूट्यूबवर बाइकिंग आणि लाइफस्टाइलबाबत व्हिडिओ पोस्ट करत असतो. तो बिग बॉस 17 मध्ये देखील दिसला होता. बिग बॉसनंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

Exit mobile version