Download App

आता जेपी नड्डा केंद्रात मंत्री; कोण होणार भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनीही (JP Nadda) मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?

  • Written By: Last Updated:

BJP President : काल एनडीए सरकारच (NDA Govt) शपथविधी झाला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. तर नितीन गडकरी, अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनीही (JP Nadda) मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणती नावे आहेत? याच विषयी जाणून घेऊ.

‘विश्रांती घ्या म्हणणाऱ्यांनाच पवार साहेबांनी विश्रांती दिली…’, रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा 

गृहमंत्री अमित शाहांकडून जेपी नड्डा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. 2020 पासून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ जानेवारीत पूर्ण झाला. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होणार आहे. दरम्याान, नड्डा यांच्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर आणि भूपेंद्र यादव यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता त्यांना मंत्रीपदही मिळाले आहे. त्यामुळं ते अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले.

Nilesh Lanke : … तर संसदच बंद पाडतो, शरद पवारांसमोर निलेश लंकेंचा शब्द 

अनुराग ठाकूर यांच्या नावाची चर्चा
त्यानंतर आता भाजप अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर मतदारसंघातून पाचव्यांदा विजयी होऊनही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. ठाकूर हे भाजपच्या युवा शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांना संघटनेचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद मिळू शकते.

तावडेंनाही मिळू शकतं राष्ट्रीय अध्यक्षपद
याशिवाय, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तावडे हे महाराष्ट्रातील असून राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी ते राज्य सरकारमध्ये मंत्री होते. पाच वर्षांपूर्वी तावडे यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नव्हते. त्यानंतर त्यांनी मोदी-शाहांचा विश्वास संपादन करत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले.

उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते डॉ. दिनेश शर्मा यांचेही नाव चर्चेत आहे. शर्मा हे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. तसेच सुनील बन्सल यांच्याकडेही अध्यक्षपद जाऊ शकते. बन्सल हे ओडिशा, बंगाल आणि तेलंगणाचे प्रभारी आहेत. याआधी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी अल्पावधीतच वरिष्ठांचा विश्वास जिंकला. त्यामुळे बन्सल यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे.

follow us