Download App

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 10 किलो IED बॉम्बसह 3 दहशतवाद्यांना अटक

Army jawans nab 3 terrorists with 10 kg explosives in Kashmir : पूंछमध्ये भारतीय लष्कराच्या (Indian Army) वतीने मोठी कारवाई करण्यात आली. भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना (Terrorist)पकडण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. दहशतवाद्यांकडून एका प्रेशर कुकरमध्ये जिवंत बॉम्बही जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या आयईडीच्या माध्यातून पुंछमधील लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, भारतीय जवांनांनी दहशतवाद्यांचा हट कट मोडून काढला.

तांदूळ शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रेशर कुकरमध्ये हा जिवंत बॉम्ब होता. 10 किलोचा आयईडीने पाक व्याप्त काश्मिरमध्ये हा बॉम्ब तयार करून भारतात पाठवण्यात आला होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने जे तीन दहशतवादी पकडले, ते तिघेही स्थानिक आहेत आणि एलओसीचे कुंपण ओलांडल्यानंतर ते 50 मीटर आत घुसल्यानंतर दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून शस्त्र, ड्रग्ज आणि आयईडी घेऊन परत येत होते. भारतीय सीमेत हे दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं लक्षात आल्यावर जवांनांनी सतर्क होत दहशतवाद्यांना पकडले. लष्कराने हे ऑपरेशन रात्री एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आले.

नगरच्या नामांतराच्या घोषणेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी..

लष्कराला पाकव्याप्त काश्मीरमधून काही घुसखोरी करतांनाच्या हालचाली आढळल्या होत्या. त्यांना इशारा देत जवानांनी त्यांना तिथेच राहण्यास सांगितले. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात भारतीय जवान थोडक्यात बचावले. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी देखील गोळीबाराची कारवाई केली. ज्यात एक दहशतवादी जखमी झाला.

तर तिन्ही दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडील 10 किलोचा आयईडी बॉम्ब आणि अमली पदार्थ जप्त केले. 10 किलोचा आयईडी बॉम्ब पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यांनी याची चौकशी केली असता, असे समोर आले आहे की, हा बॉम्ब भारतीय लष्कराविरोधातच वापरायचा होता. या बॉम्बने पुंछमध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट होता.

Tags

follow us