Download App

Video: सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात, दिल्लीत काय घडलं?

विरोधी पक्षनेते म्हणाले की, शेतकऱ्यांप्रमाणेच लडाखीचे लोकही त्यांना त्रास देण्यासाठी तयार केलेले चक्रव्यूह तोडतील आणि तुमचा अहंकारही मोडेल.

  • Written By: Last Updated:

Sonam Wangchuk Detained By Delhi Police : लडाखमधील सुमारे 150 लोकांना दिल्ली पोलिसांनी सिंघू बॉर्डरवरून ताब्यात घेतलं आहे. याचं नेतृत्व करणारे लडाखमधील समाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचाही यामध्ये समावेश आहे. लडाक केंद्रशासित प्रदेशाला सहाव्या अनुसूचीचा दर्जा देण्याची मागणी करत वांगचुक दिल्लीकडे कूच करत होते. या प्रकारावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केलाय. या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते म्हणाले की, शेतकऱ्यांप्रमाणेच लडाखीचे लोकही त्यांना त्रास देण्यासाठी तयार केलेले चक्रव्यूह तोडतील आणि तुमचा अहंकारही मोडेल. पोलिसांनी सोनम वांगचुक आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना ताब्यात घेतलं आणि नरेला इंडस्ट्रियल पोलीस स्टेशनला नेलं. सर्व आंदोलकांना येथे ठेवण्यात आलं आहे.

राहुल गांधी दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, विधानसभेचे रणशिंग कोल्हापुरातून फुंकणार

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय दिल्लीतील अनेक भागात बीएनएसचे कलम 163 लागू करण्यात आलं आहे. या अंतर्गत एकाच ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.

ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचुक आणि त्यांच्या साथीदारांना अलीपूर पोलीस स्टेशन आणि दिल्ली-हरियाणा सीमेवर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मोर्चात सहभागी महिलांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही. लेह एपेक्स बॉडीने दिल्ली चलो पदयात्रेचे आयोजन केलं आहे. कारगिल लोकशाही आघाडीही या मोर्चात सहभागी आहे.

Rajinikanth Health : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती बिघडली; चेन्नईतील रुग्णालयात केलं दाखल

गेल्या ४ वर्षांपासून दोन्ही संघटना लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी मागणी करत आहेत. त्यांच्या मागण्यांमध्ये लवकरात लवकर नोकर भरती प्रक्रिया सुरू करावी, लडाखसाठी लोकसेवा आयोग असावा. यासह लडाख आणि कारगिलसाठी लोकसभेच्या स्वतंत्र जागा देण्याचीही मागणी आहे.

follow us