Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही मिनिटांपूर्वी तुरुंगातून बाहेर आले आहेत. यावेळी मनीष सिसोदिया, संजय सिंह यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
तर दुसरीकडे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आप कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. आपण सत्यवादी असल्याने देवाने आपल्याला साथ दिली, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझी ताकद 100 पटीने वाढली असं ते म्हणाले.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, माझे आयुष्य देशासाठी समर्पित आहे आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक थेंब देशासाठी आहे. मी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. जीवनात अनेक अडचणींचा सामना केला प्रत्येक वेळी देवाने मला साथ दिली आहे कारण मी सत्यवादी होतो. ज्या लोकांनी मला तुरुंगात टाकले त्यांना वाटले की आपण जिंकलो असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
केजरीवाल पुढे म्हणाले की, मला तुम्हाला सांगायचे आहे की मी तुरुंगातून बाहेर आलो आहे. माझी ताकद 100 पटीने वाढली आहे. त्यांच्या तुरुंगाच्या जाड भिंती आणि बार केजरीवाल यांचे धैर्य कमकुवत करू शकत नाहीत. देवाने मला आजपर्यंत जसा मार्ग दाखविला तसाच तो भविष्यातही मला मार्ग दाखवेल. मी देशाची सेवा करत राहील. अनेक देशद्रोही शक्ती आहेत ज्या देशाचा विकास थांबवत आहेत आणि देशाचे विभाजन करू पाहत आहेत, देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही त्यांच्या विरोधात लढणार आहोत असेही यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले.
Yek Number : ‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष
अशा अनेक देशद्रोही शक्ती आहेत ज्या देशाचा विकास थांबवत आहेत, देशाचे विभाजन करू पाहत आहेत, देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुष्यभर त्यांच्याविरुद्ध लढलो. भविष्यातही मी असाच लढा देत राहीन.